औरंगाबाद 12 जानेवारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. कुठलीही भिड-भाड न ठेवता ते रोखठोकपणे बोलत असतात. याच त्यांच्या बिनधास्तपणामुळे अनेकदा ते अडचणीत सापडतात आणि वादही निर्माण होतो. पण त्यांनी त्याची कधी चिंता केली नाही. आजही त्यांनी एक बिनधास्त वक्तव्य करत गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली असून खासदार आणि आमदार टक्केवारी मागतात असं सांगितल्याने भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम भ्रष्टाचाराविरुद्ध आपण युद्ध छेडल्याचं सांगत असतात. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी वास्तव सांगितल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. औरंगाबद इथ एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, कुठलंही काम सुरू केलं की स्थानिक आमदार आणि खासदार हे त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिले भेटीला बोलावतात. आता ही भेट काय असते ते काही गुपीत नाही. त्यांना टक्केवारी पाहिजे असते. अशा घटनांमुळे ते कॉन्ट्रॅक्टर सोडून जातात. या प्रकारांनी मी वैतागून गेलोय असंही ते म्हणाले. अशा लोकांविरुद्ध कारवाई करा, ते सापडले तर त्यांच्यावर छापे टाका असं आपण CBIच्या संचालकांना सांगितलं अशी माहितीही त्यांनी दिलीय. हे मी विदर्भ किंवा इतर महाराष्ट्रातलं सांगत नाही तर मराठवाड्यातलं सांगतोय असंही ते म्हणाले. अभिनेत्री होण्यासाठी आईने मुलाला ट्रेनमध्ये सोडलं, 38 वर्षानंतर असं… या आधीही गडकरींनी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावरही कोरडे ओढले होते. अधिकारी फाईल्स अडवून ठेवतात त्यांची भूमिका ही नकारात्मकच असते. अशा अधिकाऱ्यांना मी दमच दिला होता. अशा अधिकाऱ्यांना मी खिडकीच्या खालीच फेकून देण्याची धमकी दिली असंही गडकरींनी एकदा सांगितलं होतं. त्यावरूनही मोठा वाद झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.