जालना 21 एप्रिल: कोरोनाला रोखण्यासाठी अवघा महाराष्ट्र झटत आहे. मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांमध्ये हॉटस्पॉट आहेत. इतर काही जिल्हेही रेड झोनमध्ये आहेत. मात्र सगळीच परिस्थिती काही वाईट नाही. अनेक जिल्ह्यांनी कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करू दिला नाही. त्यात आता जालना जिल्ह्याचाही समावेश होण्याची शक्यता असून जिल्हयातल्या एकमेव कोरोना रुग्णाच्या काही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. बुधवारी अंतिम टेस्ट होणार असून ती निगेटिव्ह आली तर जालना कोरोनामुक्त होणार आहे.
जालन्यातील 'त्या' एकमेव कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आजचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. जालनेकरांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज ठरणार असून जालन्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झालीय. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सध्यातरी एकही रुग्ण नाही. त्या जिल्ह्यांमध्ये प्रसार होऊ नये म्हणून जास्त काळजी घेतली जात आहे.
राज्यासह देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना ने अक्षरशः थैमान घातलंय. शहरातील दुखीनगर भागात राहणाऱ्या एका 65 वर्षीय महिलेच्या माध्यमातून कोरोनाने जालना जिल्ह्यात शिरकाव केला होता त्यामुळे एकच खळबळ माजली होती. प्रशासनाची अथक मेहनत आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोरोनाग्रसतांचा हा आकडा पुढे वाढला नाही. सदर महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून काही दिवसांपासून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांची धाकधूक वाढली होती.
दरम्यान, जालन्यातील 'त्या' एकमेव कोरोना पोजिटिव्ह महिलेचा आजचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळालंय. सदर महिलेचे यापूर्वीचे तिन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
दरम्यान, सदर महिलेचा स्वॅब उद्या परत एकदा तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून उद्याचा पण रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास जालना जिल्हा कोरोनामुक्त होणार असल्याचा आशावाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी News 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus