Home /News /maharashtra /

धनंजय मुंडेंच्या लेकीची चर्चा.. इवल्याशा बोटाने खासदारांना काय खुणावत असेल बरं?

धनंजय मुंडेंच्या लेकीची चर्चा.. इवल्याशा बोटाने खासदारांना काय खुणावत असेल बरं?

धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे देखील मतदार संघ पिंजून काढत आहेत. यावेळी धनंजय मुंडेंनी परळीकरांना भावनिक आवाहन केले. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांची लेक आदिश्रीची.

बीड, 24 ऑगस्ट- अजित पवार यांच्या शेजारी स्टेजवर दिमाखात बसून खासदार अमोल कोल्हे यांना इवलंसं बोट दाखवून या सरकारला आसमान दाखवा, असं तर सांगत नाही ना? ही 'छोटी परी' कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला असावा. पण हो कदाचीत ही छोटी परी असं सांगूही शकते कारण ती धनंजय मुंडे यांची लेक आहे. झाले असे की, धनंजय मुंडेंचे जोरदार भाषण सुरु होते. त्याच वेळी अमोल कोल्हे शेजारी बसणाऱ्या अजित दादांनी पाठीवर हात ठेवत स्मित हास्य केलेल्या या मुलीची चर्चा मात्र अख्या सभेमध्ये झाली. पहिल्यांदाच परळीमध्ये जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडेंचे कुटुंब देखील हजार होते. यात आई, पत्नी आणि अडीच वर्षाची आदिश्री ही देखील हजार होती. सगळे लोक भाषणात टाळ्या वाजवतात हे पाहिल्यावर तिनंही छोट्या हातांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा सगळे तिच्याकडे पाहत होते. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परळी शहरातील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत मान्यवर स्टेजवर येण्याआगोदर राष्ट्रवादीच्या गाण्यावर आदिश्रीने मनमुराद आनंद लुटला. मान्यवर आणि नेते मंडळी स्टेजवर येताना धनंजय मुंडेंकडे ती हात करत होती. भाषण सुरु झाल्यावर देखील तिची अल्लड मस्ती सुरूच होती. स्टेजवर आल्याबरोबर खा. कोल्हेंनी पहिल्यांदा तिच्याकडे हातवारे करत पाहिले. नंतर स्टेजवर दादाच्या शेजारी जाऊन बसली. यामुळे संपूर्ण परळीच्या सभेत धनूभाऊंच्या लेकीची चर्चा झाली. धनंजय मुंडेंना तीन मुली आहेत. सर्वात लहान आदिश्री अवघ्या अडीच वर्षांची आहे. पहिल्यांदाच तिने वडिलांचे आवेशपूर्ण भाषण जाहीर कार्यक्रमात ऐकले. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता मुंडे कुटुंबातील सर्वच जण कामाला लागले आहेत. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे देखील मतदार संघ पिंजून काढत आहेत. यावेळी धनंजय मुंडेंनी परळीकरांना भावनिक आवाहन केले. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांची लेक आदिश्रीची. VIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'
First published:

पुढील बातम्या