मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सदोष RTPCR किटवरून मंत्र्यांमध्येच विसंवाद, अमित देशमुखांनी आरोग्यमंत्री टोपेंचं म्हणणं फेटाळलं VIDEO

सदोष RTPCR किटवरून मंत्र्यांमध्येच विसंवाद, अमित देशमुखांनी आरोग्यमंत्री टोपेंचं म्हणणं फेटाळलं VIDEO

'या टेस्ट किट्स खरेदी संदर्भात समिती नेमण्यात आली असून लवकरच या संदर्भातील अहवाल येईल हा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.'

'या टेस्ट किट्स खरेदी संदर्भात समिती नेमण्यात आली असून लवकरच या संदर्भातील अहवाल येईल हा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.'

'या टेस्ट किट्स खरेदी संदर्भात समिती नेमण्यात आली असून लवकरच या संदर्भातील अहवाल येईल हा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.'

जालना 14 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाचं संकट असताना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या तब्बल 12 लाख RTPCR किट सदोष असल्याचं आढळून आलं होतं. या किट खेरदीचा आरोग्यमंत्रालयाशी काहीही संबंध नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या विभागाकडे बोट दाखवलं होतं. त्याला आता देशमुखांनी उत्तर दिलं आहे. टोपेंनी खोलवर माहिती न घेता वक्तव्य केल्याचं सांगत त्यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, RTPCR टेस्ट किट्स या केंद्र सरकारच्या आयसीएमआर संस्थेने निर्धारित केलेल्या पुरवठादाराकडून राज्याला मिळाल्या असून या टेस्ट किट्स सदोष निघाल्या आहेत. या किट्स सदोष असल्याचा शोध आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागाने लावला असून या टेस्ट किट्सचा पुरवठा आम्ही थांबवला आहे.

आता आयसीएमआर या टेस्ट किट्सचा पुरवठा करत असून पुढची व्यवस्था होईपर्यंत तेच या किट्सचा पुरवठा करतील. सध्या या टेस्ट किट्स खरेदी संदर्भात समिती नेमण्यात आली असून लवकरच या संदर्भातील अहवाल येईल हा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही अमित देशमुख यांनी सांगितलय.

मुसळधार पावसामुळे एका क्षणात कोसळली इमारत, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 72 लाखांवर गेली आहे. गेल्या 24 तासांत 63 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 730 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना येथून आतापर्यंत 1 लाख 10 हजार 586 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 63,01,928 वर पोहोचली आहे. सध्या भारतात रिकव्हरी रेट 87% असून कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

हार्दिक पांड्याकडे आहे 53 हिरे असलेले घड्याळ! किंमत वाचून तुमचे डोळे फिरतील

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. मंगळवारीही हीच घट कायम होती. दिवसभरात 15 हजार 353 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आजपर्यंत एकूण 12,97, 252 बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.3 टक्के एवढे झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Rajesh tope