Home /News /maharashtra /

अंगावर काटा आणणारी घटना, धक्कादायक कारणातून चिमुकल्याला इलेक्ट्रिक हिटरने दिले चटके

अंगावर काटा आणणारी घटना, धक्कादायक कारणातून चिमुकल्याला इलेक्ट्रिक हिटरने दिले चटके

चिमुकल्याच्या सर्वांगावर चटक्यांमुळे जखमा झाल्या असून, तो 30 टक्के भाजला आहे.

बुलडाणा, 5 सप्टेंबर : शेगावमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. वडिलांशी केलेल्या व्यवहारात नुकसान झाल्याचा राग असलेल्या माथेफिरूने एका चिमुकल्याला घरात बोलावून इलेक्ट्रिक हिटरचे चटके दिले आहेत. यामुळे चिमुकल्याच्या सर्वांगावर चटक्यांमुळे जखमा झाल्या असून, तो 30 टक्के भाजला आहे. जखमी मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. शहर पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीनुसार सुरेश चिंचोलकार (31, रा. भोईपुरा) यांनी महादेव सीताराम लांबे यांची जागा त्यांच्याकडून कायदेशीर खरेदी करून घेतली. मात्र पैसे कमी दिल्याचा राग धरून लांबे याच्या मनात होता. 1 सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास चिंचोलकार यांचा 4 वर्षीय दर्शन नावाचा मुलगा लांबेच्या घरासमोर खेळत असताना त्याने दर्शनला घरी बोलावले. त्याच्या छाती, मांडीसह पाठीवर इलेक्ट्रिक हिटरने चटके देऊन गंभीररित्या जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चिमुकल्याची आई घटनास्थळी मुलास सोडवण्यास गेली असता लांबे याने तिलाही इलेक्ट्रिक हिटरचे चटके दिले. चिंचोलकार यांनी या प्रकरणी पोलिसांत लांबेविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा कलम 307 नुसार दाखल करून तातडीने त्याला अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. टाले करीत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या