राहुल खंडारे, बुलडाणा, 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या रेडिओवरील कार्यक्रमाचा १००वा एपिसोड पार पडला. भाजपकडून देशात बूथ पातळीवर सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असताना एक नवरदेव चक्क लग्न असतानाही हजर राहिला. इतकंच नाही तर आधी मन की बात, नंतर लग्न असं म्हणत त्याने मोदींचं पूर्ण मनोगतही ऐकलं. बुलडाण्यात सार्वजनिक ठिकाणी मन की बातचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी सजलेला नवरदेव तिथे आला. मन की बातचा कार्यक्रम सुरु असल्याचं पाहून तो तिथेच बसला आणि आधी मन की बात नंतर लग्न अस बोलत त्याने पंतप्रधान यांचे मनोगत ऐकले. भाजपकडून सार्वजनिक ठिकाणी TV स्क्रिन लावण्यात आली होती. त्यामुळे नागरिक पंतप्रधान यांची मन की बात पाहत होते. त्यात एक नवरदेव त्या ठिकाणी पोहचला आणि पहिले मन की बात नंतर लग्न अस बोलत मोदी यांचे मनोगत ऐकत होता. 50 वर्षांपूर्वी यासाठी घर सोडलं नव्हतं की…; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’ काय म्हणाले मोदी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात चा 100वा भाग आज प्रसारित झाला. देवरुपी जनतेच्या चरणांवरचा प्रसाद म्हणजे मन की बात असल्याचं मोदींनी म्हटलं. मन की बात हा माझ्यासाठी आध्यात्मिक प्रवास असल्याचंही मोदींनी सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास करताना झालेला एक बदलही सांगितला. त्यावर मात करण्यासाठी मन की बातमधून मार्ग मिळाल्याचं ते म्हणाले. पन्नास वर्षांपूर्वी मी माझं घर यासाठी सोडलं नव्हतं की एक दिवस आपल्याच देशातील लोकांशी संपर्क करणं कठीण जाईल. माझे देशवासिय हे माझ्यासाठी सर्वकाही आहेत. मी त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत. मन की बातने मला यातून मार्ग दिला. सामान्य माणसाशी जोडण्याचा मार्ग दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या १०० व्या मन की बातमध्ये सांगितलं की, माझ्या प्रिय देशवासियांनो. नमस्कार. आज मन की बातचा १०० वा एपिसोड आहे. तुमच्या सर्वांची पत्रे, संदेश मिळाले आणि मी जास्ती जास्त पत्रे वाचायचा प्रयत्न केला. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी मन की बात सुरू केली होती. मन की बातला इतके महिने आणि इतकी वर्षे झाली यावर विश्वास बसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.