12wewबई, 26 जुलै : मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी (Malegaon Blast Case) एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. ज्या साक्षीदाराच्या जबानीमुळे एटीएसने अभिनव भारत ट्रस्टविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं, तो साक्षीदार कोर्टात सुनावणीवेळी मात्र आपल्या जबाबापासून पलटला. उलट त्याने एटीएसवरच गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 19 साक्षीदारांनी आपला जबाब बदलला (Malegaon Blast witness turns hostile) आहे. त्यामुळे एटीएसच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या बाबतचं वृत्त दी इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.
चार्जशीटमधील दावा आपला नाही
या बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसने अभिनव भारत ट्रस्ट विरोधात चार्जशीट दाखल केलं होतं. हा ट्रस्ट लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Lt Col Prasad Purohit) यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे. स्फोटाशी या ट्रस्टचा संबंध असल्याबाबत एका साक्षीदाराने जबाब दिला होता. सोमवारी (25 जुलै) कोर्टात याप्रकरणी (Malegaon Blast Case hearing) झालेल्या सुनावणीत हा साक्षीदार आपल्या जबाबापासून पलटला. आपण पुरोहितना ओळखतो, मात्र एटीएसच्या चार्जशीटमध्ये (ATS Chargesheet) जो उल्लेख आहे, तो जबाब आपला नसल्याचे या साक्षीदाराने कोर्टात सांगितले.
आईसोबत मूलही असतं क्युट आणि टॅलेंटेड? प्रेग्नन्सीत सेलिब्रिटी फॉलो करतात हा खास डाएट
एटीएसवर गंभीर आरोप
2008 साली एटीएसने आपल्याला बेकायदेशीररित्या सुमारे महिनाभर कस्टडीमध्ये ठेवलं होतं. तसंच, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा एटीएसकडून छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप (Accusations on Maharashtra ATS) या साक्षीदाराने केला. आपल्याला या प्रकरणात गोवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे आपण याप्रकरणी कोणत्याही अधिकाऱ्याकडे तक्रार केली नव्हती, असंही त्याने स्पष्ट केलं. यानंतर विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी या साक्षीदाराला विरोधी घोषित करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली.
तुमच्याही बाळाला अशी जन्मखूण असेल तर दुर्लक्ष करू नका! काहींचे असतात वेगळे संकेत
या पूर्वीही कित्येक साक्षीदार आहेत पलटले
हा बॉम्बस्फोट (Malegaon Blast 2008) दहशतवादी घटना असल्यामुळे याचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (Maharashtra ATS) देण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 200 हून अधिक साक्षीदारांनी आपला जबाब नोंदवला आहे. मात्र, सुमारे 19 साक्षीदार आपल्या जबाबापासून पलटले आहेत. त्यामुळे एटीएसच्या कार्यपद्धतीवरॉशंका उपस्थित करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 साली मालेगावमधील शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या समोर रात्री 9.35 च्या सुमारास मोठा बॉम्बस्फोट झाला होता. एका दुचाकीमध्ये असलेल्या बॉम्बचा हा स्फोट होता. या स्फोटात 6 जणांचा बळी गेला होता, तर 101 जण जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी मालेगावच्या आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखलकरण्यात आला होता. तत्कालीन राज्य सरकारने याचा तपास एटीएसकडे सोपवला होता. 21 ऑक्टोबर 2008 रोजी या प्रकरणाच्या FIRमध्ये यूएपीए आणि मकोका ही दोन कलमंही जोडण्यात आली. 20 जानेवारी 2009 रोजी एटीएसने याप्रकरणी पहिली चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये 11 जणांना अटक करण्यात आली होती, तर तीन आरोपींना फरार दाखवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Malegaon