Home /News /maharashtra /

सीमेवर कर्तव्य बजावताना साप चावला, पालघरमधील BSF जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

सीमेवर कर्तव्य बजावताना साप चावला, पालघरमधील BSF जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

कऱ्हे गावचे (Karhe village) सुपुत्र महेश रामा पडवले या जवानाला वीरमरण आले आहे.

पालघर, 06 जून: पालघर जिल्ह्यातील (Palghar district) विक्रमगड तालुक्यातील (Vikramgad taluka) कऱ्हे गावचे (Karhe village) सुपुत्र महेश रामा पडवले या जवानाला वीरमरण आले आहे. पंजाब प्रांतातील भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या महेश रामा पडवले यांना वीरमरण आलं. महेश रामा पडवले यांना साप चावल्यानंतर उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडलं. महेश यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खूपच रोमँटिक असतात या तारखेला जन्मलेले लोक; कुणालाही करू शकतात आकर्षित 5 जून रोजी बीएसएफच्या बीएन मुख्यालय 58 माधोपूर येथे कर्तव्य बजावत असताना जवान महेश पडवळे यांच्या डाव्या हाताला साप चावला होता. त्यानंतर लगेच महेश पडवले यांच्या पत्नी परमिला पडवले यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. तसंच महेश पडवले यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. उपचारादरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Palghar

पुढील बातम्या