मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांची आज पाच वाजता बैठक, विधानसभा अध्यक्षपदावर चर्चा होणार

महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांची आज पाच वाजता बैठक, विधानसभा अध्यक्षपदावर चर्चा होणार

Mahavikas Aghadi Meeting:  सध्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) पार्श्वभूमीवर राज्यातील (Maharashtra) राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 01 जुलै: सध्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) पार्श्वभूमीवर राज्यातील (Maharashtra) राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु आहेत. आज 5 वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक (Meeting) होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या चर्चेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासंदर्भात राज्यपाल यांना मुख्यमंत्री आज पाठवू शकतात.

दरम्यान संग्राम थोपटे यांच्या नावावर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा कौल असल्याचं बोललं जात आहे. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसंच काँग्रेस हायकमांडकडे थोपटे यांचं नाव पाठवावं असं राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत असल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा- अनिल देशमुख प्रकरणी ईडीकडून मोठे खुलासे,  पीएच्या ईडी कोठडीत वाढ

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध घडामोडी होताना दिसत आहेत. दुसरीकडे दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांच्या बैठका (Political leaders meeting) पार पडल्या. मंगळवारी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची (Sharad Pawar meet with CM) भेट घेतली त्यानंतर आता बुधवारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक पार पडली.

काल वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (DYCM Ajit Pawar) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनच्या संदर्भात रणनिती तसेच विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झालीच. यासोबतच इतरही विषयांवर चर्चा झाली.

First published:

Tags: Maharashtra, Monsoon, Sharad pawar cm, Uddhav thackarey