जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: सातपुड्यात पारा घसरला; तापमानाचा पारा घसरल्याने बर्फाची चादर पसरल्याचं चित्र

VIDEO: सातपुड्यात पारा घसरला; तापमानाचा पारा घसरल्याने बर्फाची चादर पसरल्याचं चित्र

VIDEO: काश्मीर नाही तर हे आहे नंदुरबार, तापमानाचा पारा घसरल्याने पसरली बर्फाची चादर

VIDEO: काश्मीर नाही तर हे आहे नंदुरबार, तापमानाचा पारा घसरल्याने पसरली बर्फाची चादर

Maharashtra Weather forecast: संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे कडाकाच्या थंडीमुळे हुडहुडी भरल्याचं पहायला मिळत आहे. ठिकिठिकाणी शेकोट्या पेटवल्याचंही चित्र पहायसला मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 11 जानेवारी : संपूर्ण देशभरात थंडीची लाट (Cold wave) आल्याचं पहायला मिळत आहे. यासोबतच गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रतील तापमानातही कमालीची घट (Cold wave in Maharashtra) झाल्याचं पहायला मिळत आहे. तापमानाचा पारा घसरल्याने महाराष्ट्र गारठला असून हुडहुडी भरली आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरुन एका अंकावर आला आहे. सोमवारी महाबळेश्वर 7 अंश, नाशिकमध्ये 7.3 अंश सेल्सिअस, जळगावात 9 अंश, मावळमध्ये 13 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 14 अंश सेल्सिअस किमान तापमाना नोंदवण्यात आले. (Temperature dropped in Maharashtra may continues in next some days)

नंदुरबारमध्ये बर्फाची चादर सातपुड्यात (Satpuda) पारा घसरला असून कडाक्याच्या थंडीनं संपूर्ण परिसर गारठला आहे. नंदुरबार (Nandurbar)मध्येही तापमानाचा पारा घसरल्याने काही ठिकाणी अक्षरश: अक्षरशः बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अजून 3 दिवस अशाच प्रकारे कडाक्याची थंडी राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

वाचा :  पुढील 3 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह होणार गारपीट; पुण्यासह या जिल्ह्यांना इशारा उत्तर भारतातही थंडीची लाट जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात अक्षरश: बर्फाची चादर पसरल्याचं पहायला मिळत आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटक या स्थितीचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. जोरदार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील एकूण 434 मार्ग बंद झाले आहेत तर 3 राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले आहेत.  हिमाचल प्रदेश में इस वक्‍त 434 संपर्क मार्ग बंद हैं, तो 3 नेशनल हाईवे और एक स्टेट हाईवे ठप हो गया है. राज्यातील पुढील हवामानाचा अंदाज 11 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची शक्यता आहे. 12 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 13 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात