मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्यापासून 18 जिल्हे पूर्णपणे अनलॉक, वाचा 'त्या' जिल्ह्यांची यादी

उद्यापासून 18 जिल्हे पूर्णपणे अनलॉक, वाचा 'त्या' जिल्ह्यांची यादी


अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

Maharashtra Unlock: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी राज्यातील अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भातली मोठी घोषणा केली आहे

मुंबई, 03 जून: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी राज्यातील अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. तिथं पूर्णपणे लॉकडाऊन हटवण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्य अनलॉक करण्यासाठी सरकारनं पाच टप्पे ठरवले आहेत. तसंच ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे आहेत. या जिल्ह्यातमध्ये पूर्णतः लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे. जाणून घ्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पूर्णतः लॉकडाऊन उठवलं आहे.

अनलॉक झालेल्या जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे

  1. ठाणे
  2. औरंगाबाद
  3. लातूर
  4. नांदेड
  5. जालना
  6. परभणी
  7. बुलढाणा
  8. नाशिक
  9. जळगाव
  10. धुळे
  11. नागपूर
  12. भंडारा
  13. गडचिरोली
  14. चंद्रपूर
  15. गोंदिया
  16. वर्धा
  17. वाशिम
  18. यवतमाळ

राज्य सरकारनं या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवले आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू राहणार असल्याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाणार असल्यांचही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- Maharashtra Unlock: राज्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यास 100 टक्के सूट

First published: