मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Swine Flu case in Thane : मुख्यमंत्री शिंदेंच्या 'घरात' घुसला स्वाईन फ्लू, डेंग्यू; 4 बळी

Maharashtra Swine Flu case in Thane : मुख्यमंत्री शिंदेंच्या 'घरात' घुसला स्वाईन फ्लू, डेंग्यू; 4 बळी


राज्यात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने डोकं वर काढलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाइन फ्लूने विळखा घातला आहे.

राज्यात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने डोकं वर काढलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाइन फ्लूने विळखा घातला आहे.

राज्यात कोरोनासह स्वाईन फ्लूचंही संकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत.

  • Published by:  Priya Lad

ठाणे, 25 जुलै : राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचाही धोका वाढतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूने विळखा घातला आहे. स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने ठाण्यात 4 बळी घेतले आहेत. तर तब्बल 34 रुग्णांना याची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.

ठाण्यात 20 जणांना स्वाईन फ्लू आणि 14 जणांना डेंग्यू झाला आहे. स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. तर स्वाईन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मृत महिला आहेत. ज्यांचं वय 72 आणि 51 वर्षे आहे. तर डेंग्यूमुळेही दोघांचा जीव गेला आहे.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 600 लोकांची पडताळणी केली जाते आहे. कोरोनासोबत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा वाढता धोका पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचा - मंकीपॉक्सपासून बचावासाठी इम्युनिटी हवी चांगली; आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

या वर्षात स्वाईन फ्लूच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 142 प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे दोन आठवड्यांतच स्वाईन फ्लूने 7 बळी घेतले आहेत. 10 जुलैला पालघरमध्ये स्वाईन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी गेल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर आता एकूण 7 मृत्यूंची नोंद झाली आहे.

22 जुलैच्या आकडेवारीनुसार स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुण्यात आहेत. त्यानंतर पालघर, नाशिक, कोल्हापूर, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नागपूर महापालिकेतही रुग्ण आढळले आहेत.

कोणत्या ठिकाणी किती रुग्ण

मुंबई - 43 रुग्ण

पुणे - 23 रुग्ण, 02 मृत्यू

पालघर - 22 रुग्ण

नाशिक - 17 रुग्ण

कोल्हापूर - 14 रुग्ण,  03 मृत्यू

हे वाचा - Monkeypox : नवं संकट! WHO नेही घेतला धसका; जगाला अलर्ट करत तातडीने केली मोठी घोषणा

नागपूर महापालिका - 14 रुग्ण

ठाणे महापालिका - 07 रुग्ण, 02 मृत्यू

कल्याण-डोंबिवली महापालिका - 02 रुग्ण

स्वाईन फ्लूची लक्षणे

याची लक्षणं सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि  कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

First published:

Tags: Health, Swine flu in india, Thane