जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दहावीच्या विद्यार्थ्यांनो, अजूनही रोल नंबर माहिती नाही? 'या' लिंकवर लगेच करा क्लिक

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, अजूनही रोल नंबर माहिती नाही? 'या' लिंकवर लगेच करा क्लिक

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, अजूनही रोल नंबर माहिती नाही? 'या' लिंकवर लगेच करा क्लिक

सोप्या पद्धतीनं तुमचा रोल नंबर कसा जाणून घ्यायचा याबाबत आम्ही माहिती देणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board SSC result 2021) आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी अशी माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. मात्र आता विशेष मूल्यांकन पद्धतीनं दहावीचा निकाल लावण्यात येणार आहे. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांना परीक्षा न झाल्यामुळे त्यांचे रोल नंबर्स (How to know SSC roll number) कळू शकले नाही आहे. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना रोल नंबर्स देण्यात आले नाहीये. त्यामुळे हा ऑनलाईन निकाल बघायचा तरी कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र आता चिंता करू नका. सोप्या पद्धतीनं तुमचा रोल नंबर कसा जाणून घ्यायचा याबाबत आम्ही माहिती देणार आहोत. अशा पद्धतीनं जाणून घ्या Roll Number रोल नंबर जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला http://result.mh-ssc.ac.in/Search/Search_Student या लिंक वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तालुका याबद्दल माहिती एंटर करावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव - सर्वात आधी आडनाव त्यानंतर स्वतःचं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव (Last name-first name- middle name) या फॉरमॅटमध्ये एंटर करावं लागेल. यानंतर ‘सर्च’ वर क्लिक करून तुम्हाला तुमचं उरण नाव आणि रोल नंबर याबद्दल माहिती कळू शकेल. यानंतर तुमचा रोल नंबर लिहून ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला अवघ्या काही मिनिटांमध्ये निकाल कळू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात