जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपनंतर MIM कडून राष्ट्रवादीला शह, नेत्याला पक्षात घेत उमेदवारीही केली जाहीर

भाजपनंतर MIM कडून राष्ट्रवादीला शह, नेत्याला पक्षात घेत उमेदवारीही केली जाहीर

भाजपनंतर MIM कडून राष्ट्रवादीला शह, नेत्याला पक्षात घेत उमेदवारीही केली जाहीर

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या उमेदवारींची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मालेगाव, 11 सप्टेंबर : विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकारणाने वेग पकडला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. तसंच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या उमेदवारींचीही घोषणा केली आहे. एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी मालेगाव मध्य या मतदारसंघातून  मौलाना मुफ्ती इस्माईल यांना उमेदवारी जाहीर केली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुफ्ती इस्माईल यांनी नुकताच राष्ट्रवादी सोडून एमआयएममध्ये प्रवेश केला होता. MIM (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करुन सर्वांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे आजच पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली होती.त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांना धक्का देत विधानसभेच्या तीन जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले. MIMने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे यांना, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्य मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात MIMने बाजी मारली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा एका पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. त्याआधी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी यांनी शिक्कामोर्तब केले. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून तो पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी MIM आणि भारिपचा काडीमोड झाला. विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला. VIDEO : हर्षवर्धन पाटलांसोबत मुलगी काँग्रेस सोडणार नाही? अंकिता पाटील म्हणतात…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात