जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra SSC Board Result 2019: निकालाआधी टेन्शन आलंय? तणाव घालवण्यासाठी या टिप्स नक्की वाचा mahresult.nic.in

Maharashtra SSC Board Result 2019: निकालाआधी टेन्शन आलंय? तणाव घालवण्यासाठी या टिप्स नक्की वाचा mahresult.nic.in

Maharashtra SSC Board Result 2019: निकालाआधी टेन्शन आलंय? तणाव घालवण्यासाठी या टिप्स नक्की वाचा mahresult.nic.in

निकाल जाहीर होणार असल्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांची आणि पालकांची घालमेल सुरू झाली असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 8 जून : दहावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजे शनिवार, 8 जूनला जाहीर होत आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाची अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल. शिवाय ‘News18 Lokmat’च्या वेबसाइटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येईल. निकाल जाहीर होणार असल्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांची आणि पालकांची घालमेल सुरू झाली असेल. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला रिझल्टचा तणाव जाणवणार नाही. अनेकजण रिझल्टच्या आधी खूप टेन्शन घेतात, कमी गुण मिळाले किंवा नापास झाले तर आत्महत्याही करतात. पण याबद्दल विद्यार्थ्यांचं समुपदेशन करताना मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, तुमची परीक्षा देऊन झाली आहे. पेपरमध्ये जे काही तुम्ही लिहिलंय, ते आता बदलता येणार नाही. दहावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही. SSC RESULT 2019 : 10वीचा निकालाची तारीख अखेर जाहीर maharesult.nic.in इथे आज पाहा Result रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदात रहावं. आपण ज्यामुळे खूश होतो, त्या गोष्टी कराव्यात. आवडती गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, गेम्स खेळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणं या गोष्टी कराव्यात. आवडते पदार्थही खावेत. ज्यांना योग, मेडिटेशन करायची सवय आहे, तेही करावं. मानसोपचारांनी पालकांसाठीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. रिझल्टच्या दिवशी पालकांनी घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवावं. पुन्हा पुन्हा रिझल्ट या विषयावर बोलू नये. महत्त्वाचं म्हणजे निकाल काही लागला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, हा दिलासा पाल्याला द्यावा. अनेकदा कमी मार्क मिळाले तर अ‍ॅडमिशन कशी मिळणार हे टेन्शन असतं. पण हल्ली करियरची क्षेत्र वाढली आहेत. संधीही भरपूर उपलब्ध आहेत. मार्कांप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात अ‍ॅडमिशन घेता येईल, हे पालक आणि मुलांनीही लक्षात ठेवावं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात