मुंबई, 8 जून : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शनिवारी (दिनांक 8 जून) जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा SSC result विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येईल. SSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटवर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहू शकणार आहेत. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाइटवरही निकाल पाहता येईल. दरम्यान, बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे. दहावीच्या निकालातील गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रेण्ड कायम राहिला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण निकाल : मुली : 82.82 टक्के मुले : 72.18 टक्के विभागवार निकाल महाराष्ट्रात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. निकालाची एकूण टक्केवारी : 77.10 टक्के कोकण विभाग (सर्वाधिक) : 88.38 टक्के नागपूर विभाग (सर्वात कमी): 67.27 टक्के मुंबई विभाग : 77.04 टक्के पुणे विभाग : 82.48 टक्के कोल्हापूर विभाग : 86.58 टक्के औरंगाबाद विभाग : 75.20 टक्के नाशिक विभाग : 77.58 लातूर विभाग : 72.87 अमरावती विभाग : 71.98 एकूण 1 हजार 794 शाळांचा निकाल 100 टक्के मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







