जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra SSC Board Result 2019: महाराष्ट्रात पुन्हा 'लातूर पॅटर्न'चाच दबदबा, 16 विद्यार्थांना 100 टक्के गुण mahresult.nic.in

Maharashtra SSC Board Result 2019: महाराष्ट्रात पुन्हा 'लातूर पॅटर्न'चाच दबदबा, 16 विद्यार्थांना 100 टक्के गुण mahresult.nic.in

PTI6_8_2015_000185B

PTI6_8_2015_000185B

Maharashtra SSC Result 2019: महाराष्ट्रात लातूर पॅटर्न अनेकदा गाजला आहे. लातूर बोर्डातील विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी ओळखले जातात.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 8 जून : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा SSC result विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येईल. SSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटसह News18 Lokmat च्या वेबसाइटवरही तुम्हाला हा निकाल पाहता येईल. महाराष्ट्रात लातूर पॅटर्न अनेकदा गाजला आहे. लातूर बोर्डातील विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी ओळखले जातात. यंदा राज्यातील 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यात लातूर बोर्डाच्या 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. असं असलं तरीही लातूर बोर्डाचा एकूण निकाल मात्र तितकासा समाधानकारण नाही. कारण कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के इतका लागला असून लातूर विभागाचा निकाल मात्र 72.87 टक्के इतका लागला आहे. कसा पाहायचा निकाल? विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमिट कार्डवर असलेला त्यांचा रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर हा निकाल पाहता येणार आहे. याशिवाय दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीखसुद्धा टाकावी लागणार आहे. हे दोन्ही रकाने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. News18 Lokmat च्या वेबसाईटवर निकाला पाहण्यासाठी फक्त नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी टाकावा लागणार आहे. तो टाकताच तुमचा निकाल पाहता येईल. दरम्यान, बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे. दहावीच्या निकालातील गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रेण्ड कायम राहिला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण निकाल : मुली : 82.82 टक्के मुले : 72.18 टक्के विभागवार निकाल महाराष्ट्रात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. निकालाची एकूण टक्केवारी : 77.10 टक्के कोकण विभाग (सर्वाधिक) : 88.38 टक्के नागपूर विभाग (सर्वात कमी): 67.27 टक्के मुंबई विभाग : 77.04 टक्के पुणे विभाग : 82.48 टक्के कोल्हापूर विभाग : 86.58 टक्के औरंगाबाद विभाग : 75.20 टक्के नाशिक विभाग : 77.58 टक्के लातूर विभाग : 72.87 टक्के अमरावती विभाग : 71.98 टक्के एकूण 1 हजार 794 शाळांचा निकाल 100 टक्के मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात