मुंबई, 8 जून : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या निकालानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची आकडेवारी 10 टक्क्यांनी घसरली आहे. हा निकाल तुम्हाला दुपारी 1 वाजता बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटसह News18 Lokmat च्या वेबसाइटवरही पाहता येणार आहे.
कसा पाहायचा निकाल?
विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमिट कार्डवर असलेला त्यांचा रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर हा निकाल पाहता येणार आहे. याशिवाय दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीखसुद्धा टाकावी लागणार आहे. हे दोन्ही रकाने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. News18 Lokmat च्या वेबसाईटवर निकाला पाहण्यासाठी फक्त नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी टाकावा लागणार आहे. तो टाकताच तुमचा निकाल पाहता येईल.
दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेतही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे.
विभागवार निकाल
महाराष्ट्रात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.
निकालाची एकूण टक्केवारी : 77.10 टक्के
कोकण विभाग (सर्वाधिक) : 88.38 टक्के
नागपूर विभाग (सर्वात कमी): 67.27 टक्के
मुंबई विभाग : 77.04 टक्के
पुणे विभाग : 82.48 टक्के
कोल्हापूर विभाग : 86.58 टक्के
औरंगाबाद विभाग : 75.20 टक्के
नाशिक विभाग : 77.58
लातूर विभाग : 72.87
अमरावती विभाग : 71.98
एकूण 1 हजार 794 शाळांचा निकाल 100 टक्के
बारावीचा निकाल कसा होता?
या वर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 82.40 टक्के तर मुलींचा निकाल 90.25 टक्के असा लागला आहे. एकूण 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. यंदा सर्वाधिक निकाल बोर्डाच्या कोकण विभागाचा लागला. कोकणचा निकाल 93. 23 टक्के तर सर्वांत कमी 82.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला.
VIDEO : EVM मधून मतदानापेक्षा जास्त मतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा