जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Political Crisis Live Update :...मग राष्ट्रवादीचे नेते कसे चालतात? शरद पवारांचा मोदींना सवाल

Maharashtra Political Crisis Live Update :...मग राष्ट्रवादीचे नेते कसे चालतात? शरद पवारांचा मोदींना सवाल

Maharashtra Political Crisis Live Update : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा एका पक्षामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि शरद पवार यांच्या बाजूने किती आमदार आहे, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

  • -MIN READ
  • Published By: Kranti Kanetkar
  • Mumbai,Maharashtra
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, पंतप्रधान मोदी

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा एका पक्षामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये आज  शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि शरद पवार यांच्या बाजूने किती आमदार आहे, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

July 5, 2023, 4:29 pm IST

आपलं नाणं चालणार नाही म्हणून फोटो लावता - शरद पवार

काही जण सांगताय मी त्यांचा गुरू आहे, आज त्यांची बैठक झाली, त्यामध्ये सगळ्यांचे फोटो होते, त्यामध्ये सगळ्यात मोठा फोटो हा माझा होता. आज मुंबईमध्ये पोस्टर लावले, तिथे सुद्धा माझे फोटो लावले आहे. त्यांना माहिती आहे, आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल, ते आपण घेतलं पाहिजे, खणखण नाणं वाचेल ते आपण घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांना माझा फोटो दाखवावा लागत आहे – शरद पवार
July 5, 2023, 4:18 pm IST

हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. - शरद पवार

काल नाशिकला पक्षात गडबड केली, पक्ष कुणाला राष्ट्रवादीचा. तुम्हीच सांगताय आम्हीच राष्ट्रवादी पक्ष, उद्या कुणीही उठेल आणि काँग्रेस माझा पक्ष, शिवसेना माझा पक्ष आहे, याला काय अर्थ आहे. हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. – शरद पवार
July 5, 2023, 4:04 pm IST

मग राष्ट्रवादीचे नेते कसे चालतात? शरद पवारांचा मोदींना सवाल

निवडणुकीत आले आणि प्रचंड शिवीगाळ केली, नुसते आरोप केले. पण तसं चालणार नाही. त्यातलं सत्य सांगितलं पाहिजे. पण तेवढी धमक दाखवली नाही. आपण देशाचे नेते आहोत. राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, त्यांची मर्यादा आहे, मान्यता आहे. राष्ट्रवादी पक्ष इतका भ्रष्ट वाटत असेल तर काल शपथविधीला राष्ट्रवादीच्या लोकांना का घेतलं? शरद पवार
जाहिरात
July 5, 2023, 4:02 pm IST

शरद पवारांचा पंतप्रधानांवर निशाणा

एखादा निर्णय घेण्याचा विचार केला तर जनतेशी संवाद करणे गरजेचे आहे.आज राज्याच्या जनतेत अस्वस्थता आहे. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद गरजेचे आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा मनात अस्वस्थता आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की, 70 लाख कोटी घोटाळा एनसीपीने केला आहे. पंतप्रधानांनी बारामतीमध्ये सांगितले की देश कसा चालवायचा हे पवार साहेबाचं बोट धरून शिकलो आहे.
July 5, 2023, 3:59 pm IST

आजची बैठक ऐतिहासिक - शरद पवार

आजची बैठक ऐतिहासिक बैठक आहे. देशाचा लक्ष या बैठकीकडे लागला आहे. पक्षाने अनेक नवीन नेते तयार केले. मनात एक भाव होता. महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवनात प्रकाश कसा येतील याचा विचार केला. संकट खूप आले. देशाची सूत्रे अश्या हाती आहे. कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पक्ष उभा राहिला. मी मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलं. याआधी राव यांच्या पक्षात काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. या सगळ्यासोबत काम केलं आहे – शरद पवार
July 5, 2023, 3:22 pm IST

भाजप सगळ्यात करप्ट पार्टी - सुप्रिया सुळे

एनसीपीला काय म्हणायचे नॅचरली करप्ट पार्टी, न खाऊंगा न खानेदुंगा, जब मुझे जरुरत पडेगी वही नॅचरली करप्ट पार्टी का पुरा का जाऊंगा. या देशात सगळ्यात करप्ट पार्टी कुठली असेल तर भाजप. आरोप मी केले नाही त्यांनी केले – सुप्रिया सुळे
जाहिरात
July 5, 2023, 3:20 pm IST

बाप आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही - सुप्रिया सुळे

लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी…हा बाप एकट्या लेकीचा नाही. तुम्हा सगळ्यांचा आहे. बाप आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला. पण बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊ…एक सांगते, छोटसं बोललं तर डोळ्यात पाणी येईल. संघर्षाची वेळ येते तेव्हा ती पदर खोचून तिच ताराराणी आणि अहिल्या देवी होते. – सुप्रिया सुळे
July 5, 2023, 2:44 pm IST

पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या - अजित पवार

2017 ला प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील बाकीचे वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. समोरून सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांतदादा हे चौघं होती. कोणती खाती, कोणती पालकमंत्री पदं सगळं, मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही. सगळं ठरलं, निरोप आला तटकरेंना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपले वरिष्ठ मीटिंग झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष आम्ही सोडणार नाही, असं सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले शिवसेना आम्हाला चालत नाही. भाजप म्हणाले, आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. 2019 ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठे उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते पटेल, उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून बोललो नाही. मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं शिवसेनेसबोत जायचं. २०१७ ला शिवसेना जातीयवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही.- अजित पवार
July 5, 2023, 2:40 pm IST

मग फडणवीसांच्या शपतविधीला का पाठवलं ? अजित पवार

सरकार गेल्यानंतर कामावर स्थगिती आल्या त्या आपल्याला उठवायचे आहे. काही तिकडच्या मिटिंगला गेलेले.
आमदार माझ्या संपर्कात आहे. मी भेदभाव करत नाही. मी दंबग नेता नाही जशी माझी प्रतिमा आहे. मी कोणाशी भेदभाव करत नाही. महिला वृद्ध मुस्लीम सगळ्यांचा विचार करून निर्णय घेईल. सत्तेत राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत असेल तर का करू, नये. २०१४ ला आम्हाला प्रफुल्लभाईंनी सांगितले आपण भाजपला बाहेरून पाठिंब दिलाय. आम्ही गेलो. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला जा सांगितले आम्ही गेलो. त्यांच्या बरोबर जायचे नव्हते तर हे का जाण्यास सांगितलं? – अजित पवार
जाहिरात
July 5, 2023, 2:34 pm IST

शरद पवारांकडे आमचे काही आमदार गेले - अजित पवार

16-16-16 चा फॉर्म्युला शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीमध्ये ठरत होता. नितीन गडकरींची इच्छा होती, पण काही आरोप होते म्हणून हे पुढे काही झालं नाही. आजही काही आमदार तिकडे मिटिंगला गेले आहे, ते आमच्याकडे येतील -अजित पवार

अजित पवार

July 5, 2023, 2:31 pm IST

तेव्हा 4 खाती जास्त घेतली - अजित पवार

2004 ला आपले 71 आणि काँग्रेसचे 69 आमदार आले. त्यावेळी मला मोठं स्थान नव्हतं. सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद द्यावं लागेल. विलासरावांनी विचारलं तुमच्यात कोण होईल? भुजबळसाहेब आर.आर.पाटील प्रमुख नेते म्हणून काम करत होते. माझी त्यावेळी इच्छा नव्हती, कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. सगळं आपल्याला मिळालं पाहिजे, असा हव्यास कुणी ठेवू नये. ती संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री आजही तुम्हाला दिसला असता. पण चार खाती जास्त घेतली.
July 5, 2023, 2:27 pm IST

तर आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता - अजित पवार

त्यावेळी संपूर्ण मैदान भुजबळ साहेबांनी गाजवले.

मला फक्त ७ जील्ह्याचे खातं दिले.

मी सकाळी लवकर उठतो रात्री उशिरापर्यंत का करतो का तर महाराष्ट्र पुढे गेले पाहीजे.

मी खूप छोटा कार्यकर्ता होतो. पण माझा प्रशासनावरची पकड कशी आरे सगळ्यांना माहिती आहेऱ्

– संधी आली होती. तेंव्हा मिळाली असती तर आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता

जाहिरात
July 5, 2023, 2:22 pm IST

मी साहेबांच्या छत्रछायेत घडलो - अजित पवार

  • मी साहेबांच्या छत्रछायेत घडलो यात मला तिळमात्र शंका नाही.
  • लोकांना न्याय देण्यासाठी मी आलो आहे.
  • मी इतिहासांत जाणार नाही. पण साहेबांनी 78 ला पुलोदचे सरकार स्थापन केले नंतर आम्ही राजकारणात आलोत. पुढे सगळ्यांनी साथ दिलीं
  • इतिहास बघितला तर आपल्या देशातला करिश्मा असलेले नेतृत्व पाहीजे असतेच
  • 77 मध्ये जनता पक्ष कुठे होता का? शोधावा लागत होता.
  • प्रत्येकाचा एक काळ असतो. आपण वयाच्या 25 पासून 75 पर्यंत चांगले काम करू शकतो.
July 5, 2023, 1:02 pm IST

मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक सुरू

मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक सुरू. माजी आमदार विनोद घोसाळकर,.रामकृष्ण मढवी, भाऊसाहेब कांबळे, शरद पाटील, दिनकर माने, अशोक धात्रक, राजाभाऊ वाझे, जयप्रकाश मुंदडा, विषधरम जितेंद्र देवरे, तुकाराम काते, गौतम चाबुकस्वार, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर उपस्थित
July 5, 2023, 12:19 pm IST

Maharashtra Political Crisis Live Update : पवार विरुद्ध पवार शक्तिप्रदर्शन

शरद पवार यांच्या समर्थनात वाय बी चव्हाण सेंटरला कार्यकर्ताची जोरदार घोषणाबाजी
जाहिरात
July 5, 2023, 12:10 pm IST

Ajit Pawar Live update : अजित पवार यांच्या बैठकीला सुरुवात

वांद्रे इथे अजित पवारांच्या बैठकीआधी ध्वजारोहण, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी
July 5, 2023, 12:04 pm IST

NCP Political Crisis Live Update : सिल्व्हर ओकवर महत्त्वाची चर्चा

मुंबईतील सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जयंत पाटील…यांची चर्चा सुरू आहे
July 5, 2023, 11:59 am IST

NCP Crisis Live Update : रत्नागिरी- राष्ट्रवादीच्या पेच प्रसंगात.....

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष बाबाजी जाधव अजित पवारांच्या गटात
तर चिपळूण राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम चिपळूण तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते शरद पवारांच्या गटात
राजापूर ,दापोली, गुहागर, मंडणगड लांजा, येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अद्याप संभ्रमात ….लवकरच आपला निर्णय जाहीर करणार
जाहिरात
July 5, 2023, 11:33 am IST

NCP Crisis : निवडणूक आयोगाच्या कोर्टात बॉल

राष्ट्रवादी मधील लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला अलीकडच्या घडामोडींची माहिती दिली.

महाराष्ट्रात शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांना बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली होती.

July 5, 2023, 11:19 am IST

Maharashtra Political Crisis Live Update : शरद पवारांचा आमदारांना फोन

शरद पवार यांनी 10 आमदाराला आज पुन्हा फोन करुन बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
गेल्या दोन दिवसापासून शरद पवार यांनी 12 आमदार सोडून जवळपास सर्व आमदाराला फोन केला आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
July 5, 2023, 10:21 am IST

Maharashtra Political Crisis Live Update : शरद पवार घेणार पहिली सभा नाशिकमध्ये

शरद पवार घेणार पहिली सभा नाशिकमध्ये

छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात शरद पवार घेणार सभा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडा नंतर शरद पवार यांची राज्यातील पहिली सभा

छगन भुजबळ हे शरद पवारांचे एकेकाळाचे खंदे समर्थक

जाहिरात
July 5, 2023, 9:50 am IST

Maharashtra Political Live Update : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहेर नाशिकमधे

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहेर नाशिकमधे

– सरोज आहेर नाशिकमध्ये घरी असल्याची माहिती

– आजरी असल्यानं नाशिकला आल्याची माहिती

– संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार

– तब्बेत बरी नसल्याने नाशिकला माघारी आले

July 5, 2023, 9:48 am IST

बैठकीवर मोठी अपडेट

अजित पवार यांची आमदार आणि मंत्री यांच्यासोबत बैठकीला सुरवात
July 5, 2023, 9:46 am IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा फलकावर शरद पवारांचा फोटो

गोंदिया जिल्ह्याचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या मतदारसंघात लावले फोटो

अजित पवार यांना आपल्या कडून शुभेच्छा देणारे फलक संपूर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लावले आहे.
पवारांनी विरोध केला असतानाही आमदाराने लावला शरद पवारांचा फोटो
आमदार म्हणतात शरद पवार बदल आम्हला आदर आहे
आमदारांनी केलं अजित पवार गटाला समर्थन

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात