LIVE: पावसाचं धूमशान सुरूच; पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान- मुख्यमंत्री यांची चर्चा

पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. पाहा पाऊस, कोरोना आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 22, 2021, 23:12 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:7 (IST)

  मराठा समाजाच्या मागण्यांच्या आश्वासनाचा मुद्दा
  कार्यवाहीची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी बैठक
  मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाच्या सचिवांची बोलावली बैठक
  बैठकीला विविध विभागाचे सचिव उपस्थित राहणार
  सोबत आमदार विनायक मेटेही उपस्थित राहणार
  उद्या संध्याकाळी 5.30 वाजता 'सह्याद्री'वर बैठक

  22:2 (IST)

  वर्धा - लालनाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले 
  समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो
  नदीनाल्यांना पूर, 20 गावांचा संपर्क तुटला
  वडगाव-पिंपळगाव मार्गाची वाहतूक थांबवली
  सायगव्हाण, सावंगी, लोखंडी, पिंपळगावला फटका
  नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

  21:44 (IST)

  पूरस्थितीबाबत नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन
  कोकणातील पूरस्थितीची पंतप्रधानांनी घेतली माहिती
  केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

  21:34 (IST)

  सातारा - पाटण तालुक्यातील गुंजाळी गावात भूस्खलन
  संपूर्ण गाव हलवण्याचे प्रशासनाकडून निर्देश
  गावकरी गाव सोडून सुरक्षित स्थळी रवाना

  21:34 (IST)

  हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले
  तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  21:28 (IST)

  राज्यातील पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा, राज्य शासनामार्फत बचावकार्य कसं सुरू आहे, त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना दिली माहिती, बचाव आणि मदतकार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं दिलं आश्वासन

  21:16 (IST)

  पूरस्थितीत मदतीसाठी शासनाची पूर्ण यंत्रणा उतरली
  नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं संपर्कात

  20:22 (IST)

  कोकण रेल्वेच्या सर्व ट्रेन्स कॅन्सल; अनिश्चित काळासाठी रेल्वे मार्ग बंद

  # कोकण रेल्वे मार्ग अनिश्चित कालावधीसाठी ठप्प 

  # वाशिष्ठी नदीला पूर आल्याने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आहे 

  # कोकण रेल्वे च्या खेड रेल्वे स्थानकात 8 ते 9 तास प्रवासी रखडून आहेत 

  # जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी पुन्हा मुंबईकडे परत फिरवली तर दुपारी 3 वाजता खेड स्थानकात थांबलेली मडगाव सीएसटी मांडवी एक्सप्रेस पाच तासापासून खेड स्थानकात उभी 

  19:12 (IST)

  केंद्र सरकार कोकणाला मदत करणार - राणे
  प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली - नारायण राणे

  18:55 (IST)

  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
  'बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं मुंबईकरांचं स्वप्न'
  27 जुलैला पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ - आव्हाड
  'उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स