मुंबई, 17 मे : काँग्रेस गटनेता आणि विरोधी पक्षनेते निवडीसाठी काँग्रेस आमदारांची होणार बैठक होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आता विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत आहे. लोकसभा निकालानंतर राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा आहे. या पदासाठीही बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच विरोधी पक्षनेतेपदासाठी स्पर्धा असल्याचं चित्र आहे. विखेंचा राजीनामा नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. विखेंच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेसनेही बाळासाहेब थोरातांना ताकद देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डीतील सभेतनंतर थोरातांकडे केलेल्या मुक्कामाचीही जोरदार चर्चा झाली. VIDEO: ‘…अन्यथा एकाही मंत्र्यांला मराठवाड्यात फिरू देणार नाही’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.