मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांचा मास्टर प्लान, पाचवा उमेदवार येणार? राष्ट्रवादीच्या कोट्यामुळे खडसेंची सीट धोक्यात?

फडणवीसांचा मास्टर प्लान, पाचवा उमेदवार येणार? राष्ट्रवादीच्या कोट्यामुळे खडसेंची सीट धोक्यात?

राज्यात आज विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

राज्यात आज विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

राज्यात आज विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 जून : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षानंतर विधान परिषदेची (MLC Election result)   निवडणूक पार पडली आहे. यामध्ये 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज्यसभा निवडणुकीत बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने हुशारीने सहावी जागा निवडून आणली होती. यासाठी त्यांनी आकड्याचं गणित वापरलं होतं. विधान परिषद निवडणुकीलाही हीच युक्ती भाजप वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे आकड्याचे गणित

भाजपच्या पारड्यात 106 आमदार आहेत. अपक्षांची मदत घेतली, तर हे संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्याच्या जोरावर 4 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र, 5 वा उमेदवार जिंकण्यासाठी भाजपला अजून 22 आमदारांची मते मिळवावी लागतील. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली. त्यात 12 अपक्षांनी पाठिंबा दिला. हे संख्याबळ आपण भाजपच्या पारड्यात धरले तरीही अजून 12 मतांची सोय पक्षाला करावी लागेल. तर विधान परिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. भाजपने आज पहिल्या 4 उमेदवारांसाठी 30 चा कोटा वापरला आहे. या कोट्यानुसार भाजपच्या 4 उमेदवारांना मतदान करण्यात आलं आहे. हा कोटा यशस्वी झाल्यास प्रसाद लाड यांना 16 मतं ट्रान्सफर होऊ शकतात. भाजप काही मतं फोडू शकला तर त्यांचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो.

'मविआ'चे संख्याबळ

महाविकास आघाडीकडे एकूण 152 आमदार आहेत. त्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसकडे 44 जण आहेत. विजयासाठी प्रत्येकाला 27 मते लागतील. त्यामुळे 6 उमेदवार जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज असेल. सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र, काँग्रेसने दोन उमेदवार उभे केलेत. हा दुसरा गडी जिंकण्यासाठी पक्षाला अजून 10 मतांची गरज आहे.

एकीकडे मतदान सुरू असताना भाजपचा मोठा नेता पोहोचला अजितदादांच्या भेटीला, विधानभवनात खळबळ

गुप्त मतदान पद्धती

विधानसभेच्या 288 सदस्यांमधून विधान परिषदेचे 10 सदस्य निवडून द्यायचेत. त्यासाठी मतदान गुप्त होते. पक्ष व्हीप काढतात, मात्र ते पक्षाच्या एजंटांना दाखवायचे नसते. त्यामुळे इथे राज्यसभेसारखे उघड नव्हे, तर गुप्त मतदान पद्धती आहे. आता या 10 उमेदवारांना जिंकण्यासाठी प्रत्येकी 27 मते हवीत. प्रत्येक मताचे मूल्य 100 असते. म्हणजे 2800 मते मिळणारा उमेदवार विजयी होतो. मात्र, मतदान कमी झाले, तर कोटा कमी होऊ शकतो. आमदारांना मते देताना 1, 2, 3, 4 असे पसंतीक्रम द्यावे लागतात. यात 1 नंतर 2 पसंती क्रमांक दिला नाही, तर त्याने दिलेले पुढचे पसंती क्रमांक बाद होतात.

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांनी दुय्यम स्थान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या पसंतीची मतं रामराजे निंबाळकरांना दिली आहेत. तर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्या क्रमांकावर प्राधान्य दिलं आहे. परिणामी एकनाथ खडसेंच्या विजयाची भिस्त आता अपक्षांवर असणार आहे. राष्ट्रवादीने आमदारांना 29 चा कोटा दिला आहे.

First published:

Tags: Eknath khadse, Vidhan parishad maharashtra