जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Kesari : धाराशिवमध्ये रंगणार 65वी महाराष्ट्र केसरी; चांदीची गदा, स्कॉर्पिओ, बुलेटसह बक्षिसांचा वर्षाव

Maharashtra Kesari : धाराशिवमध्ये रंगणार 65वी महाराष्ट्र केसरी; चांदीची गदा, स्कॉर्पिओ, बुलेटसह बक्षिसांचा वर्षाव

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

Maharashtra Kesari : नोव्हेंबर महिन्यात या कुस्ती स्पर्धेचे आय़ोजन करण्यात येणार असून लाल माती आणि मॅट अशा दोन गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धाराशिव, 12 जुलै : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा यंदाचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. यंदाची ही कुस्ती स्पर्धा ६५वी असेल. नोव्हेंबर महिन्यात या कुस्ती स्पर्धेचे आय़ोजन करण्यात येणार असून लाल माती आणि मॅट अशा दोन गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होईल. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिवमध्ये पाहणी केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक व तारीख हे लवकरच जाहीर केले जाणार आहे. मानाची चांदीची गदा, सकार्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. दरम्यान बालाघाट डोंगररांगा वर ह्या स्पर्धा पहिल्यांदा होत असल्याने धाराशिव जिल्यातील कुस्तीपटू ही आनंदी झाले आहे. नारळ पाणी पिऊन केला सराव, डोंबिवलीच्या इशाचा इंडोनेशियात सिल्व्हर पंच! लाल माती आणि मॅटमध्ये 20 विविध वजनाच्या गटात ही स्पर्धा होणार आहे. यात 45 संघ असून 900 खेळाडू, 150 पंच, तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा थरार पाहण्यासाठी 50 हजार ते 1 लाख प्रेक्षक दर दिवशी हजर राहतील. कुस्तीपट्टू आणि कुस्ती शौकिनांसाठी हा कुंभमेळाच असतो. महाराष्ट्र केसरीतील लढती धाराशिव शहरातल्या तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wrestler
  • First Published :
जाहिरात
जाहिरात