जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार

Maharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार

Maharashtra Health Department Recruitment 2021

Maharashtra Health Department Recruitment 2021

राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे ताडतीने भरण्यात येणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल: राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार येत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वित्त विभागाला पदभरतीच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील (Maharashtra Health Department) पाच संवर्गातील 10 हजार 127 पदे तातडीने भरण्याची (10127 posts vacant post fulfill soon)  मागणी केली आहे. सरकारतर्फे कोरोनाला थोपवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10 हजार 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. कुठल्या पदांसाठी होणार भरती? तंत्रज्ञ औषध निर्माता  आरोग्य सेवक  आरोग्य सेविका  आरोग्य पर्यवेक्षक वाचा:  Aarogya Vighag Recruitment: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या पद आणि पगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत 10 हजार 127 आरोग्य कर्मचारी पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने 10 हजार 127 पदे भरण्याच्या संदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात