अखेर सहाव्या दिवशी नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात

अखेर सहाव्या दिवशी नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात

अखेर सहाव्या दिवशी अकोल्यात नाफेड कडून नोंद केलेल्या तूर खरेदीला सुरू, इतर ठिकाणी कधी?

  • Share this:

28 एप्रिल : अकोल्यातून आज सहाव्या दिवशी नाफेडकडून अखेर तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र अजून बाकी ठिकाणी तूर खरेदी केंद्रावरून पडून आहे.

22 तारखेपर्यंत नाफेड केंद्रावर नोंदणी केलेल्या तूरीचीच खरेदी होणार आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या पण खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा असलेल्या तूर उत्पादकांचं काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातला शेतकरी काबाड-कष्टानं पिकवलेली तूर घेऊन रस्त्यावर आहे. त्याचा आक्रोश मात्र सरकारपर्यंत पोहोचताना दिसत नाहीय. मुख्यमंत्री एखाद्या अधिकाऱ्यासारखं बोलतायत. त्यांच्या तारखेनं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालीय.

विरोधक सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र दौरा करतायत. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची या स्थितीतून सुटका करावीच लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घ्यावा लागेल. तसं नाही झालं तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट कधीही होऊ शकतो.

 

 

First published: April 28, 2017, 2:04 PM IST

ताज्या बातम्या