• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ठाकरे सरकारकडून महिला पोलिसांना दिलासा; कामाचे तास आता 12 ऐवजी 8

ठाकरे सरकारकडून महिला पोलिसांना दिलासा; कामाचे तास आता 12 ऐवजी 8

याबाबत माहिती देताना राज्य डीजीपी संजय पांडे म्हणाले की, 'सरकारने महिलांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिला पोलिसांना 12 ऐवजी 8 तास ड्युटी करावी लागेल.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे सरकारने महिला पोलिसांच्या कामाचा वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने काढलेल्या नवीन आदेशानुसार आता महिला पोलिसांना आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. याबाबत माहिती देताना राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे म्हणाले की, 'सरकारने महिलांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिला पोलिसांना 12 ऐवजी 8 तास ड्युटी करावी लागेल. राज्यातील ठाकरे सरकारने महिला पोलिसांबाबतीत मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ कमी केली आहे. महिलांसाठी ड्युटीचे तास खूप जास्त होते. महिला पोलिसांच्या समस्या पाहता सरकारने त्यांची ड्युटी चार तासांनी कमी केली आहे. सरकारच्या नव्या आदेशानंतर महिला पोलिसांना आता 12 ऐवजी आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. महिला पोलिसांच्या कामाची वेळ कमी करण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. याबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. पुरुष पोलिसांच्या कामाच्या वेळांबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
  Published by:News18 Desk
  First published: