मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोकणात कायम स्वरूपी उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, राज्य सरकारचा मोठा निर्णय

कोकणात कायम स्वरूपी उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government big decision for Konkan: कोकणवासियांवर येणारी संकट टाळण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Maharashtra Government big decision for Konkan: कोकणवासियांवर येणारी संकट टाळण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Maharashtra Government big decision for Konkan: कोकणवासियांवर येणारी संकट टाळण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी, 25 जुलै: रायगड (Raigad) आणि रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण (Flood due to heavy rain) झाली. या महापुराच्या संकटात दरड सुद्धा कोसळण्याच्या (Landslide) घटना घडल्या आणि अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. कधी चक्रीवादळ, कधी पूर तर कधी दरड कोसळण्याच्या घटना यामुळे कोकणी माणूस नेहमीच संकटात सापडत असतो. कोकणवासियांवरचे हे संकट कायमस्वरूपी टाळण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्विकासमंत्री विजय वडेट्टीवार दाखल झाले. खेड (Khed) येथील पाहणी दौऱ्यात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले की, सातत्याने कोकणात विविध संकट येत आहेत. गेल्या चार वर्षांत तीन वेळा विविध संकट आली आहेत. या संकटावर मात करण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना म्हणून भूमिगत वीज केबल टाकण्याची आवश्यकता आहे. कायम स्वरूपी उपाययोजना केल्या जातील. कारण पूर, वादळ आल्यावर वीज यंत्रणा ठप्प होते. भूमीगत वीज केबल असल्यास वीजेचं संकट निर्माण होणार नाही. कायमस्वरूपी उपाययोजना नक्की केल्या जातील आणि त्यासाठी आम्ही आता 3700 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समितीने मान्य केले आहे.

रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO

खेडमध्ये दरड दुर्घटना

खेडमधील पोसरे - बौद्धवाडी येथे अतिवृष्टीत दरड दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेतील मातीच्या ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह आज सकाळी काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. अजूनही 11 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी एनडीआरएफ, सैन्य दल, शीघ्र कृतीदालाचे जवान गेल्या 24 तासंपासून बचाव आणि मदतकार्य करत आहेत. मध्यरात्री 3 पोकलन मशीन पोसरे येथे दाखल झाल्याने आजपासून मदत करायला वेग आला आहे. अनेक अडचणींचा सामना करत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

First published:

Tags: Konkan, Maharashtra, Raigad, Rain, Rain flood, Ratnagiri