शिरूरमधून अमोल कोल्हेंचं काय होणार? EXIT POLL चा अंदाज समोर

शिरूरमधून अमोल कोल्हेंचं काय होणार? EXIT POLL चा अंदाज समोर

ही निवडणूक आढळराव पाटील यांना नेहमीप्रमाणे सोपी नक्कीच नव्हती.

  • Share this:

शिरूर, 20 मे : शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई झाली. सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान दिलं आहे.

ही निवडणूक आढळराव पाटील यांना नेहमीप्रमाणे सोपी नक्कीच नव्हती. कारण त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे यांच्याकडे स्वत:ची प्रतिमा आणि राष्ट्रवादीचं या भागातील संघटन असं दुहेरी अस्त्र होतं. पण शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही या भागात दांडगा जनसंपर्क आहे. मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. न्यूज18 च्या एक्झिट पोलनुसार, अमोल कोल्हे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. त्यामुळे आढळराव पाटील हे शिरूरमधून पुन्हा विजयी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिरूरमध्ये मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 साली झालेल्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. आढळराव पाटील यांनी तब्बल 1 लाख 79 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत आढळरावांनी आपला गड राखत राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांना तब्बल 2 लाख 98 हजार मतांनी धूळ चारली होती. यावेळी देशभरात असलेल्या मोदी लाटेचा फायदा आढळराव यांनाही झाला होता. कारण या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढत होते.

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

जुन्नर

आंबेगाव

खेड-आळंदी

शिरूर

भोसरी

हडपसर

VIDEO : अशोक चव्हाणांची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, वर्तवला नांदेडचा अंदाज

First published: May 20, 2019, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading