मुंबई, 7 एप्रिल : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संक्रमितांची भितीदायक वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 926 रुग्णांची नोंद झाली, जे गुरुवारच्या 803 पेक्षा जास्त आहेत. त्याचबरोबर या काळात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 81,48,599 झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात आतापर्यंत 1,48,457 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 24 तासांत 276 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, जे मागील दिवसाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी अधिक आहे. तर गोंदिया, कोल्हापूर आणि रायगडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 423 लोक बरे झाले आहेत. त्यानंतर कोविडमधून बरे झालेल्या लोकांची संख्या 79,95,655 झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,487 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यात राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून कोविड -19 व्यवस्थापनाशी संबंधित तयारीची तपासणी करण्यास सांगितले. मांडविया यांनी राज्यांना संक्रमणाची अधिक प्रकरणे असलेल्या ठिकाणे ओळखण्यास सांगितलं आहे. यासोबत चाचणी वाढवणे आणि पायाभूत सुविधांची तयारी सज्ज असावी. वाचा - कॉनव्हॉय सोडला, स्टाफ सोडला, अजित पवार खासगी गाडीने अचानक कुठे गेले? राज्यांचे आरोग्य मंत्री, मुख्य आणि अतिरिक्त मुख्य सचिवांसह डिजिटली आयोजित बैठकीत मांडविया यांनी लसीकरणाला गती देण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा गांभीर्याने विचार करावा, विरोधक दुसरीकडे, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 ची प्रकरणे वाढत असल्याने राज्य सरकारने ताबडतोब लक्ष घालावे. पवार यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले की, “नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, आम्ही राज्य सरकारला केलेल्या उपाययोजनांबद्दल विचारले होते आणि कोविड - 19 परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम होण्याच्या योजनेबद्दल विचारले. चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले की, संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, कोणीही परिस्थिती गांभीर्याने घेत असल्याचे दिसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.