LIVE Updates: आजपासून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयील निवासी डॉक्टर संपावर!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | October 01, 2021, 00:03 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:22 (IST)

    मुख्य सचिव सीताराम कुंटेंना CBI कडून पाचारण - सूत्र
    डीजीपी संजय पांडेंनाही CBI कडून पाचारण - सूत्र
    अनिल देशमुख प्रकरणात सीबीआय घेणार माहिती - सूत्र

    21:0 (IST)

    पंजाबचे माजी सीएम अमरिंदर सिंगांनी काँग्रेस सोडली
    मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

    20:42 (IST)

    नवी मुंबई - पोटनिवडणूक मविआ एकत्र लढणार - अजित पवार
    'एका उमेदवाराला तिन्ही पक्ष एकत्र पाठिंबा देईल'
    जिथं जास्त पाऊस तिथं सिमेंटचे रस्ते करणार - अजित पवार
    'कोकणातील बहुतांश रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करणार'
    'नाशिक-मुंबई हायवेवरही सिमेंटचे रस्ते बनवणार'
    मागासवर्ग आयोगाला पूर्ण मदत करणार - अजित पवार
    'निधी कमी पडून देणार नाही, कर्मचारी पुरवणार'
    '7 डिसेंबरपर्यंत शक्ती कायदा बनवण्याचा प्रयत्न'
    नागपूर अधिवेशनात बिल मंजूर करणार - अजित पवार
    'सुहास कांदे, मुख्यमंत्री आणि माझी बैठक झाली'
    छगन भुजबळांबरोबर चर्चा होणार - अजित पवार
    3 पक्षांचं सरकार, भांड्याला भांडं लागणार - अजित पवार

    20:27 (IST)

    मुंबई महापालिकेची नवरात्रोत्सवासाठी नियमावली
    'मुंबईत गरब्याचं आयोजन करता येणार नाही'
    'नवरात्रोत्सवात फक्त पूजा, भजन करता येणार'
    गरब्याऐवजी रक्तदान शिबीर घेण्याच्या सूचना
    डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना

    17:55 (IST)

    मुंबई आणि उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी प्रदान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भूपेंद्र यादवांचे मानले आभार

    17:49 (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्याचा पुणे दौरा रद्द
    राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस होते पुणे दौऱ्यावर
    राज ठाकरे आता घटस्थापनेला पुणे दौऱ्यावर येणार
    मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची माहिती

    17:20 (IST)

    नुसत्या घोषणा करून पोट भरत नाही, मदत द्या - राजू शेट्टी
    ...अन्यथा सरकारला आंदोलनाला सामोरं जावं लागेल - शेट्टी

    17:5 (IST)

    'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
    पुणे मनपानं तात्काळ 1 लाख सिरिंज खरेदी केल्या
    संध्या 6 वाजता मिळणार सिरिंजची डिलिव्हरी
    पुणे मनपा हद्दीत उद्यापासून लसीकरण पुन्हा सुरू

    16:44 (IST)

    यंदा फक्त 10 टक्के निधी मिळाला - भुजबळ
    माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे - भुजबळ
    सुहास कांदेंच्या आरोपांना भुजबळांचं प्रत्युत्तर
    'निधी कोरोनासाठी वापरण्याचे सरकारचे होते निर्देश'
    'निधीवाटप निर्णय जिल्हाधिकारी समितीनं घेतलाय'
    'मी निधी वाटतो हा कांदेंचा आरोप चुकीचा'
    'पालकमंत्री म्हणून सर्वांना समान वाटपाचं माझं काम'
    हायकोर्टात जाणं योग्य नाही - छगन भुजबळ
    'असे आरोप आघाडी असताना योग्य नाही'
    सर्वांना एकत्र काम करायचं आहे - भुजबळ
    'मी धमकी देत नाही मात्र विनंती जरूर करतो'
    माझ्या बाजूनं वादाला पूर्णविराम देतो - भुजबळ

    16:20 (IST)

    बुलडाणा - भंडारीतील धक्कादायक घटना, 13 वर्षांच्या मुलीला विकण्याचा घाट, नातेवाईकांकडून मुलीला विकण्याचा प्रयत्न, मुलीच्या आजीकडून संतापजनक प्रकार उघड, 'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी, बातमीनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं, पिंपळगाव राजा पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स