• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: आरोग्यमंत्र्यांनाच मास्कचा विसर, भर कार्यक्रमात राजेश टोपे विनामास्क वावरले

Live Updates: आरोग्यमंत्र्यांनाच मास्कचा विसर, भर कार्यक्रमात राजेश टोपे विनामास्क वावरले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 30, 2022, 16:18 IST
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:8 (IST)

  यंदा होळी आणि रंगपंचमी सण उत्साहात साजरे करू शकता, मात्र कोरोनाचे नियम आणि मास्क वापरणं बंधनकारक, टास्क फोर्सचे सदस्य गौतम भन्साळींची माहिती

  21:54 (IST)

  राफेल नदालची विश्वविक्रमी कामगिरी
  ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं
  अटीतटीच्या सामन्यात नदालची बाजी
  रशियाच्या डॅनिल मेदवेदवचा पराभव
  राफेल नदालनं 21वं ग्रँडस्लॅम जिंकलं
  फेडरर आणि जोकोविचला मागे टाकलं

  21:22 (IST)

  पुणे - रिव्हर्स घेताना रिक्षाचा तोल सुटला
  जनता वसाहतीतील कॅनॉलमध्ये रिक्षा पलटी
  रिक्षामध्ये एक माणूस पाण्यात गेला वाहून
  स्थानिकांच्या प्रयत्नांनंतरही वाचवू शकले नाही

  20:47 (IST)

  नगरपंचायतीत मविआला भरघोस यश - जयंत पाटील
  'मविआचे अधिकाधिक नगराध्यक्ष निवडून येतील'
  यासाठी प्रयत्न करा, विजयी सदस्यांना आवाहन

  19:53 (IST)

  राज्यपाल कोश्यारींच्या अहमदनगर दौऱ्यात बदल
  राज्यपालांचा शनिशिंगणापूरऐवजी आधी शिर्डी दौरा
  साईंच्या संध्याकाळच्या आरतीसाठी राज्यपाल शिर्डीत
  भगतसिंग कोश्यारींचं शासकीय विश्रामगृहावर आगमन

  19:43 (IST)

  वर्धा कोरोना अपडेट :
    
  दिवसभरात 691 नवे कोरोनाबाधित आढळले

  होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण - 3284

  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या - 56151 

  आज कोरोनामुक्त-  157

  आज एकूण मृत्यू -1 

  एकूण मृत्यू - 1336

  जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण  - 3373

  19:10 (IST)

  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अभिवादन केलं.

  नाना पटोले यांची प्रतिक्रिया :

  भाजप नेहमी गांधीजींच्या विचारधारेच्या विरोधात राहिला आहे. नथुराम गोडसेच्या चित्रपटावर भाजप बोलत नाही.
  मी काही बोलतो यावर भाजप हंगामा करते. माझ्याकडून वध हा शब्द निघाला. मला हत्या म्हणायचं होतं. भाजप गोडसे आणि महात्मा गांधीजींच्या बाबत बोलत नाही. गोडसेच्या विरोधात आंदोलन करत नाही.

  विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया :

  काँग्रेस पक्षाचा चित्रपटाला विरोध असणे स्वाभाविक आहे. एनसीपीने सुद्धा गांधींची विचारधारा सोडली नाही.
   

  19:0 (IST)

  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
  '90% देशी दारूची दुकानं काँग्रेस-राष्ट्रवादीची'
  वाईनच्या मुद्यावरून दरेकरांची पटोलेंवर टीका

  18:57 (IST)

  'राष्ट्रीय मान्यतेसाठी छोटे पक्ष निवडणुकीच्या मैदानात'
  अमित शाहांचा गोव्यातल्या प्रचारात शिवसेनेला टोला
  विकासासाठी भाजपला निवडून देण्याचं केलं आवाहन

  18:47 (IST)

  गोवा - अमित शाहांचं सावर्डेतील प्रचार सभेत स्वागत
  'भाजप सरकारनं विकासाचा झंझावात आणला'
  भाजपनं समृद्धी गावागावात पोहोचवली - अमित शाह
  गोव्यात अनेक विकासकामं मार्गी लागली - शाह
  भाजप वचनपूर्ती करणारा पक्ष आहे - अमित शाह
  गोव्यानं काँग्रेसला संधी दिली होती - अमित शाह
  अव्यवस्था, अस्थिरतेशिवाय काहीच केलं नाही - शाह

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स