आणखी एका सेलिब्रिटीकडून जामिनासाठी अर्ज
अभिनेता अरमान कोहलीचा जामिनासाठी अर्ज
21:56 (IST)
ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यब्रात कुमारांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती, दिल्लीतील कार्यालयात अतिरिक्त संचालक म्हणून सत्यब्रात यांच्या नियुक्तीचे आदेश जारी, सत्यब्रात कुमारांची 4 वर्षांसाठी ही नियुक्ती असणार, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
21:16 (IST)
'फोन टॅपिंगचा गोपनीय अहवाल'
'देवेंद्र फडणवीसांनी उघड केला नाही'
'जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनी उघड केला'
रश्मी शुक्ला यांच्या वतीनं हायकोर्टात दावा
'शुक्लांविरुद्धची चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित'
अॅड. महेश जेठमलानींनी केला आरोप
21:13 (IST)
'ईडीनं चौकशीसाठी पाठवलेलं समन्स रद्द करा'
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची याचिका
मुंबई हायकोर्टात उद्या दुपारी होणार फैसला
21:1 (IST)
'त्या' रात्री क्रुझवर नेमकं काय झालं?
'न्यूज18 लोकमत'वर मोठा खुलासा
क्रुझवर उपस्थित असलेल्या व्यक्तीची माहिती
मी आर्यनला ओळखतही नाही - अविन साहू
मी ड्रग्ज घेतलंही नव्हतं - अविन साहू
'माझी मेडिकल टेस्टसुद्धा झाली नाही'
'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह बातमी
20:0 (IST)
मुंबई पोलीस दलातील 18 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
19:36 (IST)
शाहरूखनं घेतली वकील सतीश मानेशिंदेंची भेट
शाहरूख खाननं सर्व टीमचे मानले आभार
19:6 (IST)
एसटी कामगारांचं आंदोलन मागे, एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडं भत्ता देण्याचं मान्य, परिवहन मंत्री अनिल परबांसोबत कामगार संघटनांची झाली बैठक
19:3 (IST)
ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी आता राज्यस्तरावर वेब आणि मोबाईल अॅप, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी
18:47 (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत 'सह्याद्री'वर बेस्ट कामगार संघटनांची झाली बैठक, दिवाळी बोनससह कामगार संघटनांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर बैठकीत चर्चा, उद्या पुन्हा वर्षा निवासस्थानी कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक आयोजित केली असून उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करणार
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स