Live Updates : भाजपच्या डिनर डिप्लोमेसीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा? आशिष शेलारांची सविस्तर प्रतिक्रिया...

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 22, 2021, 23:13 IST
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:18 (IST)

  - भाजपची डिनर डिप्लोमसी
  - अधिवेशनाचा पहिला दिवस आणी सहभोजन
  - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं, भाजप आमदारांना खास आमंत्रण
  - आमदारांसोबत आधी होणार बैठक
  - या बैठकीत, आमदारांना दिल्या जाणार महत्वाच्या सूचना
  - देवेंद्र फडणवीस यासह प्रमुख नेते,साधणार संवाद
  - कुलब्यातील महिला विकास मंडळ सभागृहात होतेय बैठक
  - अनेक प्रमुख नेते झाले दाखल

  19:58 (IST)

  दिव्यांगांचे शिक्षण व विकासाचा बृहत आराखडा एक महिन्यात सादर होणार - धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती

  दिव्यांगांसाठी स्वतंत्र महाविद्यालये, कौशल्य व स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत - धनंजय मुंडे

  दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर करण्यासाठी 5% राखीव निधी व्यतिरिक्त जिल्हा नियोजन मधून निधी देण्यासाठी धोरण आखणार - मुंडे यांची घोषणा

  19:37 (IST)

  मालेगावच्या देवरपाडे भागात फिरत असलेला बिबट्या अजूनही मोकाट, भीतीपोटी ग्रामस्थांनी रात्र काढली जागून, बिबट्याला जेरबंद करण्याची केली मागणी

  18:55 (IST)
  नवीन वर्षात राहुल गांधींच्या महाराष्ट्रात 4 सभा होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती, जानेवारीला राहुल गांधींची नागपूर इथं शेतकरी रॅली होणार, राहुल गांधींची पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात रॅली होणार, प्रियंकाही या रॅलीमध्ये उपस्थित राहणार - नाना पटोले
   
  18:39 (IST)

  टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक  करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून आज पून्हा 10 लाख रुपये हस्तगत करण्यात आलं आहे.ज्या व्यक्तीकडे सुपे यांनी पैसे ठेवले होते त्याच व्यक्तीने स्वतः हुन 10 लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिले आहे.अत्ता पर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 57 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे.अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

  18:11 (IST)

  देवेंद्र फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका
  'सरकारवर नियम बदलण्याची नामुष्की आली'
  'असंतोषाची भीती असल्यानं नियम बदलला'
  बहुमत असतानाही भाजपला टाळलं - फडणवीस
  'हरकतींसाठी 10 दिवसांची मुदत 1 दिवसावर आणली'
  'अध्यक्ष निवडीच्या पद्धतीत बदल करावा लागला'
  'सरकार किती असुरक्षित आहे हे लक्षात आलं'
  राज्य सरकार दिशाभूल करतंय - फडणवीस
  राज्य सरकारचे मदतीचे दावे फोल - फडणवीस
  'शेतकऱ्यांना भरपाईसाठी दिलेलं पॅकेज फसवं'
  पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत - फडणवीस
  वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही - फडणवीस
  'सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही'
  भास्कर जाधवांचं वक्तव्य आक्षेपार्ह - फडणवीस
  कुणीही सभागृहापेक्षा मोठं नाही - फडणवीस
  हे वर्तन सहन होणार नाही - देवेंद्र फडणवीस
  '...तर ओबीसी आरक्षण वाचवू शकलो असतो'
  ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र
  पेपरफुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत - फडणवीस
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आरोप
  ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम दिलं - फडणवीस

  18:9 (IST)

  पुणे - तुकाराम सुपेकडून आणखी 10 लाख जप्त
  आतापर्यंत 2 कोटी 57 लाख रुपये केले हस्तगत
  तुकाराम सुपेनं एका परिचिताकडे ठेवले होते पैसे

  17:50 (IST)

  समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याचे समोर आलेय.शासनाच्या मुंबई जात पडताळणी समितीला माहिती अधिकार मार्फत नितीन यादव यांनी माहीती मागीतली होती.मात्र  नोकरीत रुजु होताना समीर वानखेडेंनी नेमके कोणते प्रमाणपत्र दाखल केले यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  17:44 (IST)

  "शिवसेना आमदार भास्कर जाधव आज विधानसभेत स्वतःच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी गोंधळ घातला, जाधवांचा व्यवसाय म्हणजे वाळू चोरी, वाळू सोडून गाळ उपसायला रॉयल्टी नको सांगून गाळ काढण्याचं कारण सांगून वाळू चोरली जाते, सभागृहाला तुमचे धंदे माहित नाही पण आम्हाला तुमचा डाव कळला", असा घणाघात माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर केला. 

  17:43 (IST)

  ऍड गोपालकृष्ण हेगडे (एसटी महामंडळ वकील) - 

  - अजय गुजर यांनी माघार घेतल्यानंतर आता हा संप कोणत्या संघटनानेचा
  - महामंडळानं एसटी डेपोत नोटीस लावायचे निर्देश
  - वर्तमानपत्रात नोटीस पब्लिश करणार
  - कोर्ट अवमान प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाचे निर्देश
  - कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मेडिकल,तपासणी करून कामावर घेणार
  - समिती विलीनीकरण शक्य आहे का या अहवालावर काम सुरू
  - समिती अहवाल कोर्टात सादर करणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स