• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : देवेंद्र फडणवीस पेनड्राईव्ह बॉम्ब प्रकरण, तेजस मोरेची प्रवीण चव्हाणांविरोधात तक्रार

Live Updates : देवेंद्र फडणवीस पेनड्राईव्ह बॉम्ब प्रकरण, तेजस मोरेची प्रवीण चव्हाणांविरोधात तक्रार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 19, 2022, 21:31 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:27 (IST)

  देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण

  तेजस मोरे यांची सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात दिली तक्रार

  चव्हाण खोटे आरोप करून बदनामी करत असल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दिली तक्रार

  दोनच दिवसांपूर्वी प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्या विरोधात दिली होती तक्रार

  विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमधील स्टिंग प्रकरणात प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्या परस्परांविरोधात क्रॉस कम्प्लेंट

  21:7 (IST)

  डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी बातमी
  पुणे कोर्टात साक्षीदारांसमोर आरोपींची ओळख परेड
  'सचिन अंदुरे, शरद कळसकरला हत्या करताना पाहिलं'
  कोर्ट ओळख परेडमध्ये साक्षीदारानं दोघांना ओळखलं
  पुण्यातील कोर्टात आज निम्मी ओळख परेड झाली
  कोर्टातील उर्वरित ओळख परेड 23 मार्चला होणार
  वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आरोपी
  विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर आहेत आरोपी
  पुनाळेकर वगळता 4 आरोपी कोर्टात होते प्रत्यक्ष हजर

  हत्येतील पाच आरोपीवर शिवाजीनगर येथील नावंदर कोर्टात सी.बी.आय मार्फत  बुधवार १५ सप्टेंबर रोजी आरोपपत्र निश्चित झाले आहेत... 

  20:38 (IST)

  - महाविकास आघाडी सरकारने कोणालाही सोबत घ्या, मोदींना थांबवण्याची ताकद कोणात नाही
  - केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निशाणा

  20:20 (IST)

  - पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवर खंडाळा बोगद्यात दोन गाड्यांच्या विचित्र अपघात 
  - एक महिला आणि पुरुष प्रवासी गंभीर जखमी

  18:23 (IST)

  शिवसेना खासदारांचा 22 ते 24 मार्च दौरा
  मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार
  संजय राऊत भाजपच्या बालेकिल्ल्यात जाणार
  संजय राऊत करणार नागपूर जिल्ह्याचा दौरा
  संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका 

  18:0 (IST)

  'चीन आणि कोरियामध्ये वाढती रुग्णसंख्या'
  'केंद्राचं राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र'
  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
  सतर्कता बाळगून काळजी घेण्याचं आवाहन 

  17:56 (IST)

  मुंबई :
  मनसेच्या बाईक रॅलीला परवानगी नाकारली 

  मनसे कडून शिवजयंती निमित्त शिवाजी पार्क येथे बाईक रॅली काढण्यात येणार होती 

  मुंबई पोलिसांकडून ही परवानगी नाकारण्यात आलीय

  17:50 (IST)

  कोल्हापूर :

  जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

  अचानक आलेल्या पावसाने तारांबळ

  वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन

  अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना

  17:50 (IST)

  मुंबई :

  वरळी-शिवडी कनेक्टर पुलाचं काम लवकरच सुरु होणार
  अनेक दुकानं, घरं बाधित होणार
  पुलाच्या कामामुळे शेजारील इमारतींना हादरे बसत असल्याची नागरिकांची तक्रार
  तक्रारीनंतरही एमएमआरडी लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप

  17:25 (IST)

  कासुर्डी गावातील कंपनीला भीषण आग
  पुणे-सातारा महामार्गावरील घटना
  पेंटिंग केमिकल पॅकिंग कंपनीत आग
  केमिकलमुळे आग आणखी भडकली
  आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट
  अग्निशमनकडून आग विझवण्याचे प्रयत्न
  आगीमुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान
  आगीत कोणतीही जीवितहानी नाही 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स