Live Updates: धुळ्यात अनपेक्षित घटना, गोंदूर विमानतळाच्या धावपट्टीलगत भीषण आग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 18, 2022, 21:40 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    23:9 (IST)

    पंढरपूर तालुक्यातील चळे येथेल विजेचा शॉक लागून दोन शेतमजुरांचा मृत्यू

    पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमा नदी काठावर विद्युत पंप दुरुस्तीचे काम करत असताना, विजेचा धक्का बसून राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे या दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला

    22:2 (IST)

    पुणे - सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात दारूच्या नशेतील तरुणांचा राडा, एका चारचाकीचं नुकसान, 8-9 वाहनचालकांना मारहाण

    22:0 (IST)

    शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढू, नवी मुंबईतील शिक्षक संघाच्या बैठकीत शरद पवारांची ग्वाही

    21:41 (IST)

    कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक
    सत्यजित कदमांना भाजपची उमेदवारी जाहीर
    काँग्रेसच्या जयश्री जाधवांशी होणार थेट लढत

    21:36 (IST)

    धुळे : 

    - गोंदूर विमानतळाच्या धावपट्टीवलगत भीषण आग

    - धावपट्टी शेजारी असलेल्या गवताला लागली आग 

    - अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु

    - सुदैवाने कुठलेही आर्थिक नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती

    - या विमानतळावर चालते वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र

    - सुदैवाने आज रंगपंचमीनिमित्त सुट्टी असल्याने धावपट्टीवर नव्हते एकही विमान 

    21:33 (IST)

    नागपूरच्या शिवा परिसरातील घटना
    दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
    रंगपंचमीनंतर नदीवर आंघोळीला गेले होते

    21:28 (IST)

    रंगपंचमी साजरी झाल्यानंतर नदीवर आंघोळीला गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडवून मृत्यू
    नागपूर जिल्ह्यातील शिवा (सावंगा) येथील घटना
    मंगेश इंगळे व देवानंद पवार असे  मृतक तरुणांचे नाव

    21:25 (IST)

    पंजाबमध्ये उद्या 'आप'चे 10 मंत्री शपथ घेणार
    भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

    21:14 (IST)

    इंदापूर पोलिसांची अवैद्य गुटख्यावर कारवाई
    इंदापूर पोलिसांनी पकडला 20 लाख रुपये किंमतीचा अवैद्य गुटखा

    20:56 (IST)

    25 मार्चला दुपारी 4 वाजता योगी आदित्यनाथांचा लखनौमध्ये मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी
    पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स