LIVE: नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 18, 2021, 22:24 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:12 (IST)

  भारत विरुद्ध श्रीलंका पहिली वन-डे
  भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
  श्रीलंकेचा 7 विकेट्सनं उडवला धुव्वा
  भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी

  22:1 (IST)

  उल्हासनगर - चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
  नाल्याच्या प्रवाहात 4 वर्षांचा मुलगा वाहून गेला
  कॅम्प-3च्या शांतीनगर गऊबाई पाड्यातील घटना

  20:56 (IST)

  मुंबईसह 4 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा इशारा
  पुढच्या काही तासांत दमदार पावसाचा अंदाज
  मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघरला ऑरेंज अलर्ट

  20:31 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली महत्वपूर्ण बैठक
  पालकमंत्र्यांसमवेत मुंबईतल्या आपत्तीचा आढावा
  'मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी'
  'कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहा'
  'दरड भाग, मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष ठेवा'
  मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसाठी उपाययोजना करा - मुख्यमंत्री

  20:6 (IST)

  मुंबईतील भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचं पाणी शिरल्यानं जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयत्रे बंद पडली, मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज होणारा पाणीपुरवठा बाधित, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू, पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, महापालिका प्रशासनाचं आवाहन

  19:43 (IST)

  राज्यात दिवसभरात 9,000 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 5,756 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 180 रुग्णांचा मृत्यू
  राज्याचा रिकव्हरी रेट 96.24, मृत्युदर 2.4%
  राज्यात सध्या 1 लाख 3,486 अॅक्टिव्ह रुग्ण

  18:33 (IST)

  नंदुरबार - गाडी दरीत कोसळून अपघात
  भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

  18:0 (IST)

  विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची टीका
  मुंबईतील दुर्घटनेला महापालिका जबाबदार - दरेकर
  यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात आली होती - दरेकर
  'मात्र कोणतीही अंमलबजावणी केली गेली नाही'
  'धोकादायक इमारती, दरडी यासंदर्भात माहिती'
  महापालिकेत, विधिमंडळात माहिती दिलीय - दरेकर
  लवकरात लवकर मदत जाहीर करावी - प्रवीण दरेकर
  'यापुढे अशा दुर्घटना घडणार नाही याची नोंद घ्यावी'

  17:23 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 6 वा. महत्वपूर्ण बैठक
  वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हीसीद्वारे करणार चर्चा
  मुंबईत पावसामुळे उद‌्भवलेल्या आपत्तीचा आढावा

  16:13 (IST)

  'फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना काय निर्णय घेतले?'
  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले'
  उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा - पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज चव्हाणांना राहुल गांधींचा विसर?
  खडसेंनी पक्ष बदलल्यावर कारवाई - पृथ्वीराज चव्हाण
  'एकनाथ खडसे भाजपात धुतल्या तांदळासारखे होते'
  आणि नंतर काय झालं? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स