liveLIVE NOW

Live Updates: आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण नाही

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 16, 2021, 20:58 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:58 (IST)

  पुणे - म्हाडा पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी
  प्रीतेश देशमुखच्या घरी सापडली अनेक ओळखपत्रं
  'काही बड्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं'
  'ज्यांच्यावर संशय त्यांना चौकशीला जरूर बोलवू'
  अजूनही कसून चौकशी सुरू आहे - पोलीस आयुक्त
  'याबाबत आताच अधिक माहिती देणं उचित नाही'
  अमिताभ गुप्तांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती

  21:16 (IST)

  परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षं परदेशात राहून घेता येणार कामाचा अनुभव, विद्यार्थ्यांना पोस्ट स्टडी वर्क व्हिसासाठी राज्य शासन देणार नाहरकत; धनंजय मुंडेंच्या निर्णयानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

  20:51 (IST)

  कॉंग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, प्रणिती शिंदेंची प्रवक्तेपदी निवड

  19:29 (IST)
  राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, राज्याला काहीसा दिलासा पण अजूनही 26 रुग्णांचे अहवाल जनुकीय लॅबकडे प्रलंबित
  18:5 (IST)

  पुणे - म्हाडा पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी
  तुकाराम सुपेंना पोलिसांनी चौकशीला बोलावलं
  तुकाराम सुपे राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष
  टीईटी परीक्षेचाही पेपर फुटलाय का? चौकशी सुरू
  प्रीतीश देशमुखच्या घरी सापडलेलं ओळखपत्र
  टीईटी परीक्षार्थींचं सापडलं होतं ओळखपत्र

  17:56 (IST)

  औरंगाबादमध्ये अजून एक धक्कादायक प्रकार
  RTPCR बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड
  RTO कार्यालयात प्रमाणपत्र देताना रंगेहाथ पकडलं
  कार्यालयात RTPCR चाचणीशिवाय बंद होता प्रवेश
  म्हणून जागेवर बोगस प्रमाणपत्र देत होती टोळी
  औरंगाबादच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

  17:48 (IST)

  दहावी-बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
  दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
  दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल
  बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल

  16:56 (IST)

  'राज्यपालांकडे विधानपरिषदेवर 12 नावं पाठवली'
  'त्यांच्याबद्दल निर्णय झाला नाही हे कशात बसतं?'
  हे योग्य आहे का? उपमुख्यमंत्र्यांचा सवाल
  हे लोकशाहीत चालतं का? - अजित पवार

  16:39 (IST)

  बैलगाडा शर्यतींवर बंदी मागे घेण्याचा निर्णय
  निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत
  'बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकलं'
  चिवट लढा देणाऱ्या पशूप्रेमींचं केलं अभिनंदन

  16:32 (IST)

  नाशिक - रहिवासी भागात सिलेंडरचा स्फोट
  सिलेंडरच्या स्फोटानं आगीचा प्रचंड लोळ
  रघुवीर शिव पुष्प रो-हाऊसमधील घटना
  रासबिहारी लिंक रोड भागात अग्निशमन पथक दाखल

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स