liveLIVE NOW

Live Updates: अमरावतीत शांतता, यशोमती ठाकूर यांनी घेतली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 13, 2021, 22:35 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 24 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:52 (IST)

  मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा निनावी फोन
  वांद्रे रेल्वे पोलिसांना आला निनावी फोन
  पोलिसांकडून निनावी फोनबाबत चौकशी सुरू
  रेल्वे पो.आयुक्त कैसर खालीद यांची माहिती
  मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवली
  घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही 

  21:22 (IST)

  चकमकीत मोठा माओवादी नेता ठार?
  मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती
  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा नेता
  मिलिंद तेलतुंबडेवर होतं 50 लाखांचं बक्षीस ??? 

  20:26 (IST)
  अमरावती हिंसाचार प्रकरणानंतर सर्वपक्षीय बैठक
  पालकमंत्री यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली बैठक 
  20:12 (IST)

  यवतमाळ - डॉ.अशोक पाल हत्याकांडाचा उलगडा
  यवतमाळ पोलिसांनी 3 आरोपींना केली अटक
  ऋषिकेश साळवे, प्रवीण गुंडजवार, एक अल्पवयीन
  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल - डॉ.दिलीप भुजबळ पाटील
  ग्रंथालयातून वसतिगृहाकडे जाताना अशोक पालची हत्या
  दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांचा गतिरोधकावर धक्का
  वादानंतर डॉ.अशोक पालवर आरोपींनी चाकूनं केले वार 

  20:4 (IST)

  एसटी संपाबाबत 'सह्याद्री'वर महत्त्वाची बैठक संपन्न
  आंदोलकांचे प्रतिनिधी, शिष्टमंडळानं केली चर्चा
  'एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची आग्रही मागणी'
  'विलीनीकरणाची मागणी मान्य करू शकत नाही'
  परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं स्पष्ट
  हायकोर्टामुळे विषय उच्चस्तरीय समितीकडे - परब
  'समितीच्या शिफारसीनंतर विलीनीकरणाचा विचार'
  एसटी संकटात, कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं - परब
  'संप सुरूच राहिल्यास मोठा आर्थिक तोटा होईल'
  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब
  एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं - अनिल परब
  'संप मागे घेईपर्यंत निलंबनाच्या मागणीवर चर्चा नाही'
  माझ्या दृष्टीनं आजची बैठक सकारात्मक - अनिल परब
  'एसटी कामगारांनी आडमुठेपणाचं धोरण अवलंबू नये'
  अनिल परबांचं संपकरी एसटी कामगारांना आवाहन


  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडग्याचे प्रयत्न
  बैठकीत सकारात्मक चर्चा - गोपीचंद पडळकर
  'एसटी संप मागे घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही'
  संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार - पडळकर


  तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - खोत
  'प्रत्येक विभागातील 5 सदस्यांसोबत चर्चा करणार'
  'ग्रुप डिस्कशन करून उद्या अंतिम निर्णय घेणार'
  पुन्हा चर्चा करायची की नाही हा निर्णय उद्या - खोत
  जी कर्मचाऱ्यांची भूमिका तीच आमची - सदाभाऊ खोत

  19:41 (IST)

  मुंबईनं लसीकरणात गाठला ऐतिहासिक टप्पा
  कोरोनामुक्त मुंबईच्या दिशेनं एक पाऊल पुढे
  मुंबईत 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
  आतापर्यंत 92,36,500 नागरिकांना पहिला डोस
  आता नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणाचं ध्येय 

  19:35 (IST)

  गडचिरोलीत 26 माओवाद्यांचा खात्मा
  पोलिसांनी माओवाद्यांना घातलं कंठस्नान
  ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात चकमक
  देशातील या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
  पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची माहिती 

  17:0 (IST)

  अमरावती शहरात सध्या तणावपूर्ण शांतता
  अमरावतीत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी
  अमरावती शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
  'लोकांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार'
  नागरिकांनी शांतता पाळावी; गृहमंत्र्यांचं आवाहन 

  16:44 (IST)

  क्रुझ ड्रग्ज प्रकरणात मोहक जैस्वालची सुटका
  50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

  15:59 (IST)

  निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या पोलीस कोठडीत वाढ
  मुंबईच्या  Esplanade Court सुनावली कोठडी
  खंडणीच्या प्रकरणात सचिन वाझेला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स