LIVE Updates: कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 10, 2021, 21:03 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:51 (IST)

  कोरोना संबंधित परिस्थिती आणि लसीकरणाचा उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींकडून आढावा, आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांच्या वाढीबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली, राज्यांना प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा बफर स्टॉक ठेवण्याच्या सूचना, मोदींनी पुढील काही महिन्यांसाठी लसींचं उत्पादन, पुरवठा आणि पाईपलाइनचा घेतला आढावा

  20:4 (IST)

  मुंबईत दिवसभरात 441 नवीन रुग्णांची नोंद
  मुंबईत दिवसभरात 175 कोरोनामुक्त, 5 मृत्यू

  19:53 (IST)

  नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदी
  पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांचे आदेश
  5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई
  गणेश मंडळात प्रत्यक्ष दर्शनाला, मिरवणुकीला बंदी

  18:52 (IST)

  नागपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस
  वीज पडून 2 तरुण ठार, एक गंभीर जखमी
  खापरखेडा भागातील चकणापूरची घटना

  17:50 (IST)

  मुंबई - साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार
  खैरानी रोड परिसरातील धक्कादायक घटना
  बलात्कार करून महिलेला फेकलं रस्त्यावर
  याप्रकरणी पोलिसांकडून एका आरोपीला अटक
  आणखी काही आरोपी असण्याचा संशय, तपास सुरू

  15:7 (IST)
  नाशिक - पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला नाशिककरांचा विरोध, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा, 3 वर्षांचा कार्यकाळ असताना अवघ्या 11 महिन्यांत बदली झाल्यानं नाराजी
  12:49 (IST)

  'लालबागच्या राजा'ची थोड्याच वेळात प्रतिष्ठापना
  मध्यममार्गानं प्रश्न सोडवला - विश्वास नांगरे पाटील
  लालबाग मार्केटमधील दुकानं अखेर उघडली
  स्थानिक दुकान मालकांना पास - नांगरे पाटील
  'दुकानांमध्ये 1+1 अशा दोनच माणसांना परवानगी'
  आरतीसाठी फक्त 10 लोकांना परवानगी - पोलीस
  'लालबागच्या बाप्पाचं मुखदर्शन/प्रत्यक्ष दर्शन नसेल'
  'सार्वजनिक गणपतींचं फक्त ऑनलाईन दर्शन'
  144 च्या ऑर्डरमध्ये मॉडिफिकेशन - नांगरे पाटील 

  11:11 (IST)

  'लालबागच्या राजा'ची थोड्याच वेळात प्रतिष्ठापना
  'लालबागच्या राजा'च्या प्राणप्रतिष्ठापणेस विलंब
  पोलीस-पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही चर्चा सुरूच
  स्थानिक व्यापारी, दुकानदारांना पोलिसांची नोटीस
  लालबाग मार्केटमधील स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी
  'लालबागच्या राजा'च्या प्रत्यक्ष दर्शनाला आहे बंदी
  बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाहीत
  मग स्थानिक रहिवाशांची दुकानं बंद का केली?
  लालबाग मार्केटमधील रहिवाशांचा पोलिसांना सवाल
  रहिवाश्यांच्या मागण्यांवर गणेशोत्सव मंडळंही ठाम

  11:3 (IST)

  देशात गेल्या 24 तासात 34,973 नवे रुग्ण 
  देशात गेल्या 24 तासात 37,681 कोरोनामुक्त
  गेल्या 24 तासात 260 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  देशात 3 लाख 90 हजार 646 अॅक्टिव्ह रुग्ण
  देशात आतापर्यंत 72,37,84,586 लसीकरण

  10:1 (IST)

  पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार उघड
  नर्सच्या वेशभूषेतील महिलेनं 3 महिन्यांच्या मुलीला पळवलं
  आरोपी महिलेला अटक, चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत
  महिलेला अपत्य होत नसल्यानं बाळ पळविल्याची माहिती
  बाळ पळवल्यानं 'ससून'च्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स