• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: बारामतीत 30 हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला अटक

LIVE Updates: बारामतीत 30 हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला अटक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 03, 2021, 18:25 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:13 (IST)

  ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू आहे - समीर वानखेडे
  काही गोष्टी आता बोलू शकत नाही - समीर वानखेडे
  आता तिघांना कोर्टात सादर केलं - समीर वानखेडे
  उद्या 5 जणांना कोर्टात करणार हजर - समीर वानखेडे

  21:36 (IST)

  कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात 5 लाख रुपये, 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा; महिला-बालविकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूरांची माहिती

  20:26 (IST)

  देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका
  'हे सरकार मराठवाडा-विदर्भविरोधी सरकार'
  100% नुकसान, सरसकट मदत करा - फडणवीस
  'सरकारनं विमा कंपनीला वटणीवर आणलं पाहिजे'
  मदत करणं हे सरकारचं कर्तव्य - फडणवीस
  'शेतकऱ्यांना मदत न केल्यास आंदोलन उभारू'
  'सरसकट मदत आम्ही केलीय, या सरकारनंही करावी'
  'विमा कंपनीकडून नुसती कागदपत्रांची मागणी'
  विमा देत नसतील तर ब्लॅकलिस्ट करावं - फडणवीस
  'सरकारनं व्यवस्था करून ई-पीक योजना राबवावी'
  'सरकारनं तात्काळ मदत शेतकऱ्यांना करावी'
  सरकारनं सर्वांचं सर्वेक्षण केलं पाहिजे - फडणवीस
  'विशेष कॅबिनेट बैठक घेऊन विशेष पॅकेज जाहीर करा'
  दसऱ्यापूर्वी भरपाईचे पैसे दिले पाहिजे - फडणवीस

  20:10 (IST)

  कोणाचाही मुलगा असो, सर्वांना कायदा समान - अजित पवार

  19:53 (IST)
  ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीची कारवाई, आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी, 4 ऑक्टोबरपर्यंत तिघांना एनसीबी कोठडी, उद्यापर्यंत आर्यन खान एनसीबीच्या रिमांडमध्ये, आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच, सोमवारी कोर्टात पुन्हा होणार सुनावणी
  19:2 (IST)

  नाशिक - पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क
  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण
  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार उपस्थित
  थीम पार्कची नितीन गडकरींनी केली पाहणी

  19:0 (IST)

  अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन
  'मेडिकल, रुग्णालयं वगळता सर्व आस्थापनं बंद ठेवा'
  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आदेश
  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
  उद्यापासून 13 ऑक्टोबरपर्यंत कडक लॉकडाऊन

  16:55 (IST)

  जेजे रुग्णालयात 3 आरोपींची वैद्यकीय तपासणी
  वैद्यकीय तपासणीनंतर तिघेही एनसीबी कार्यालयात

  16:51 (IST)

  अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
  बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 5 प्रवाशांना कारची धडक
  अपघातात चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश
  खड्ड्यांमुळे अनियंत्रित झाली कार, स्थानिकांचा आरोप
  नागपूर जिल्ह्यातील सातनवरी परिसरातील घटना

  16:23 (IST)

  काल ताब्यात घेतलेल्या तरूणांना आता आरोग्य तपासणीसाठी जे जे रूग्णालयात आणलं
  तिघे जण आहेत. 
  शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स