राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जारी केली आहे.
चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड या आठ जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण आहे.
राज्यातील डेल्टा प्लसच्या 5 बळींपैकी रत्नागिरी जिल्ह्यात दोन तर बीड, मुंबई, रायगडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे.