मुंबई, 9 ऑगस्ट : सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या 9 तर भाजपच्या (BJP) 9 अशा एकूण 18 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे सगळ्यात श्रीमंत आहेत, तर संदीपान भुमरे यांची संपत्ती सगळ्यात कमी आहे. 18 पैकी 6 मंत्र्यांवर एकही गुन्हा दाखल नाही. कोणाला मंत्रिपदं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली. भाजपकडून गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील तर शिंदेंकडच्या शंभूराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. भाजपच्या मंत्र्यांची संपत्ती आणि गुन्हे मंत्री संपत्ती गुन्हे सुधीर मुनगंटीवार 11.4 कोटी 2 सुरेश खाडे 4 कोटी 3 राधाकृष्ण विखे पाटील 24 कोटी 0 चंद्रकांत पाटील 5.99 कोटी 2 मंगलप्रभात लोढा 441 कोटी 5 अतुल सावे 22 कोटी 6 विजयकुमार गावित 27 कोटी 9 गिरीश महाजन 25 कोटी ० शिंदेंच्या मंत्र्यांची संपत्ती आणि गुन्हे मंत्री संपत्ती गुन्हे तानाजी सावंत 115 कोटी 0 दादा भुसे 10 कोटी 1 दीपक केसरकर 82 कोटी 0 संजय राठोड 8 कोटी 4 उदय सामंत 4 कोटी 0 शंभुराज देसाई 14 कोटी 0 गुलाबराव पाटील 5 कोटी 1 अब्दुल सत्तार 20 कोटी 8 संदिपान भुमरे 2 कोटी 9
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.