मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस उटलून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 07:50 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

लोणावळा, 21 ऑक्टोबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस उटलून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे.

(वाचा :मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ.. विवाहितेने केली आत्महत्या)

कामशेत बोगदापासून काही अंतरावर सोमवारी (21 ऑक्टोबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होती. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.

(वाचा :महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद)

ही खासगी बस कामशेत बऊर गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात झाला.  अपघातानंतर महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Loading...

(वाचा :भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईवर लष्कर प्रमुखांचा मोठा खुलासा)

भारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...