जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अब्दुल सत्तार पवारांच्या बारामती कृषी प्रदर्शनात, सुप्रिया सुळेंना म्हणाले...

अब्दुल सत्तार पवारांच्या बारामती कृषी प्रदर्शनात, सुप्रिया सुळेंना म्हणाले...

अब्दुल सत्तार पवारांच्या बारामती कृषी प्रदर्शनात, सुप्रिया सुळेंना म्हणाले...

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पवार कुटुंबियांच्या बारामती कृषी प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनानंतर अब्दुल सत्तार यांनी पवार कुटुंबियांबाबत भाष्य केलं.

  • -MIN READ Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

बारामती, 19 जानेवारी : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पवार कुटुंबियांच्या बारामती कृषी प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनानंतर अब्दुल सत्तार यांनी पवार कुटुंबियांबाबत भाष्य केलं. मुख्य म्हणजे काहीच दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती, यानंतर सत्तार यांना माफीही मागावी लागली होती. ‘खूप चांगलं प्रदर्शन भरवलं आहे. 2023 सालातील हे सगळ्यात चांगलं प्रदर्शन आहे. कृषी प्रदर्शनात फोटो असतात आणि लिहिलेली माहिती असते, पण इथे डेमो पाहायला मिळतो. इथली शेती बघितल्यानंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचे शेतीमध्ये असलेलं योगदान पाहायला मिळतं,’ असं सत्तार म्हणाले. ‘जुनी शेती नवीन करण्याचं काम शरद पवारांनी केलं. इथे तंत्रज्ञान वापरून कशी शेती केली जाते, याचं प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने इथे येऊन हे प्रदर्शन पाहिलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण केलं पाहिजे. याठिकाणी संशोधन केलं जातं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो,’ असं सत्तार यांनी सांगितलं. ‘खासगी विद्यापीठ आणि सरकारी विद्यापीठ यातील फरक स्पष्ट झाला पाहिजे, जेणेकरून सरकारी विद्यापीठ काय करतात आणि खासगी विद्यापीठ काय करतात, यातील फरक स्पष्ट होईल. ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्यावर धोरणात्मक निर्णय घ्यायचा प्रयत्न करणार. शेतकऱ्यांनी इकडे येऊन प्रदर्शन पाहावं,’ असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं. अशाच शाखा विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू झाल्या पाहिजेत, अशी मागणीही अब्दुल सत्तार यांनी केली. मंत्रालयात मंत्री भेटत नाहीत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती, त्यावरही अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं. आरोप करणारे आरोप करतील, आम्ही 3 दिवस मंत्रालयात असतो, आता मी इकडे आहे तर मंत्रालयात कसा भेटणार? असा प्रश्न सत्तार यांनी विचारला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय धोरणात्मक आहे, यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मी कृषीमंत्री आहे, मागणी करणं माझं काम आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात विमा द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असं सत्तार यांनी सांगितलं. मी याठिकाणी कृषीमंत्री म्हणून आलो आहे, इकडे मी राजकीय पुढारी म्हणून आलेलो नाही. शरद पवारांपासून रोहित पवारांपर्यंत सगळ्यांची नावं घेतली. सगळे पवार चांगले आहेत, त्यांची पावर अशीच राहो हीच इश्वरचर्णी प्रार्थना अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात