मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मानलं गड्या! इमारत हलत असतांनाही स्वप्निलचं धाडस, 2 मिनिटांत वाचवला 15 लोकांचा जीव

मानलं गड्या! इमारत हलत असतांनाही स्वप्निलचं धाडस, 2 मिनिटांत वाचवला 15 लोकांचा जीव

तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती.

तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती.

तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती.

महाड 24 ऑगस्ट: महाडमधील दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरु होतं. 8 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. अपघाताच्या आधी काही मिनिटं ही इमारत हलत होती. त्याचवेळी याच इमारतीत राहणाऱ्या स्वप्नील शिर्के या तरुणाने प्रसंगावधान राखत 15 लोकांना इमारतीच्या बाहेर काढलं. त्यामुळे त्या सगळ्यांचे प्राण वाचले. यात स्वप्निल मात्र जखमी झाला आहे. त्याच्यावर रानडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दोन मिनिटे जरी उशीर झाला असता तर ते सगळे ढिगाऱ्याखाली अडकले असते असंही त्याने सांगितलं.

स्वप्निल बाहेर पडत असतांनाच सिमेंटचा एक तुकडा आदळला आणि त्याच्या पायाला लागला. पण त्यातून तो थोडक्यात बचावला.

तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती. अनेक कुटुंबाचं वास्तव्य असलेली ही इमारत कोसळल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

NDRFच्या दोन टीम बचावकार्यासाठी रवाना झाल्या असून आणखी एक टीम पाठवण्यात येत आहे.

महाडमध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीचे युनुस शेख व पटेल हे ठेकदार होते. या इमारतीत एकूण 40 कुटुंब राहात होते. त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज घ्यावी लागणार आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह स्थानिकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचं निदर्शनात आल्याने काही कुटुंब बाहेर पडली होती.

दरम्यान, मागच्या काही वर्षात या भागात सिंगल लोड बेअरिंग इमारतींचं प्रमाण वाढलं आहे. हा प्रकार जीवघेणा आहे आणि प्रशासनपण याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

First published: