तब्बल 12 तास उलटूनही ढिगारा हटवण्याचं काम पोलीस आणि NDRFकडून सुरू आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत. तर इमारत कोसळताना 60 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
6 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 16 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या युद्धपातळीवर त्यांना शोधण्याचं कार्य सुरू आहे.
महाड दुर्घटनेप्रकरणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले असून या प्रकरणाची चौकशी देखील कऱण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
या 5 मजली इमरतीमध्ये एकूण 43 कुटुंब राहात होते त्यापैकी काही जण लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गावीच अडकले होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.