मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूर लोकसभा निकाल 2019 : भाजपचे सिद्धेश्वर महास्वामी आघाडीवर

सोलापूर लोकसभा निकाल 2019 : भाजपचे सिद्धेश्वर महास्वामी आघाडीवर

भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते.

भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते.

भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते.

    सोलापूर, 23 मे- सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात अर्थात 18 एप्रिल रोजी मतदान झाले. यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती.भाजपकडून जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सोलापुरात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सोलापूरमध्ये भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा विजयही निश्चित झाला आहे. भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी - 4,98,752 कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे - 3,50,996 वंचित : प्रकाश आंबेडकर - 160736 1, 47, 756 मतांनी भाजप उमेदवार आघाडीवर ( 50 हजाराची मतमोजणी बाकी) काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे यांना 86 हजार 673 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना फक्त 32 हजार मते मिळाली आहेत. इथं प्रकाश आंबेडकर यांच्या मतांनी सुशिलकुमार शिंदेंना दणका दिला आहे. यामुळे जय सिद्धेश्वर महास्वामी हे 29 हजार 877 मतांनी आघाडीवर आहेत. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि दोनदा खासदार राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारणही तसेच आहे. सुशीलकुमार त्यांच्याविरोधात भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. एवढेच नाही तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान देखील सुशीलकुमारांसमोर असणार आहे. सोलापूरमधल्या लिंगायत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीत धार्मिक गुरू जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवल्याचे बोललं जातं आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधून आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर येथील गणित बदलले आहे. सोलापुरात दलित मतदारांची संख्या जास्त आहे. त्याचा फायदा प्रकाश आंबेडकर यांनाही होऊ शकतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना टक्कर देऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या दिग्गजांनी घेतल्या सभा.. सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रकाश आंबेडकर यासारख्या दिग्गजांच्या सभा झाल्या. भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिप चांगलीच वादग्रस्त ठरली. 'माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय', असे सुशीलकुमार शिंदे यांचे भावनिक आवाहन, तर प्रकाश आंबेडकर यांच्या रॅलींना मिळणारा तुफान प्रतिसाद यासारखे अनेक मुद्यांमुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत चांगलीच गाजली. 2014 मध्यो काँग्रेसचा बुरुज ढासळला सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बुरुज ढासळला. या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले. नवखे असलेल्या भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांनी तब्बल दीड लाख मतांनी सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव केला. सोलापूरची जागा सुशीलकुमार शिंदेंच्या हातून गेली. बसप आणि आम आदमी पक्षानेही येथे निवडणूक लढवली होती. सोलापूरमध्ये मोहोळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट आणि पंढरपूर या विधानसभा जागा काँग्रेसकडे आहेत. सोलापूर शहर दक्षिण आणि उत्तर या दोन विधानसभेच्या जागा भाजपकडे आहेत. खासदार शरद बनसोडेंची सुमार कामगिरी.. खासदार शरद बनसोडे यांचा मतदारसंघात म्हणावा तितका वावर नाही. तसेच त्यांच्या सुमार कामगिरीमुळे लोकांमध्ये बनसोडे यांच्यावर नाराजी आहे. तशीच पक्षात होती. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या चाळीस वर्षांच्या गडावर मिळवलेला विजय भाजपला यंदाही कायम ठेवायचा आहे. त्यामुळे बनसोडे यांच्याऐवजी जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देऊन भाजपने सुशीलकुमार शिंदे यांना तगडे आव्हान दिले आहे. एक्झिट पोलने वर्तवले सुशीलकुमारांचे भविष्य.. सोलापुरात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव होईल, आणि ही जागा भाजपला मिळेल, असा न्यूज 18 च्या सर्व्हेचा अंदाज आहे. आता सत्य काय ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे. VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला
    First published:

    Tags: Solapur S13p42

    पुढील बातम्या