Home /News /maharashtra /

भावना गवळींचा विजयाचा इतिहास, पाचव्यांदा जिंकली खासदारकीची निवडणूक

भावना गवळींचा विजयाचा इतिहास, पाचव्यांदा जिंकली खासदारकीची निवडणूक

शिवसेनेच्या भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आपला 1999पासूनचा इतिहास 2019मध्येही कायम ठेवला आहे.

    यवतमाळ, 23 मे : शिवसेनेच्या भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील 1999पासूनचा आपला इतिहास लोकसभा निवडणूक 2019मध्येही कायम ठेवला आहे. जनतेनं भावना गवळी यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. येथे गवळींनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना पराभवाची धूळ चारली आहे. या मतदारसंघातील आधीचा इतिहास पाहता शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीतही विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच मैदानात उतरवण्याचं ठरवलं. त्यांच्याविरोधात काँग्रेसनंही माणिकराव ठाकरेंसारखा तगडा उमेदवार रिंगणात उतरवला. म्हणून काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. गवळींच्या करिश्म्यासमोर काँग्रेसच्या ठाकरेंचं आव्हान फिके पडल्याचं दिसत आहे. यवतमाळ- वाशिम निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी, भाजप : 522528 मतं 46.12 टक्के माणिकराव ठाकरे, काँग्रेस : 409353 मतं 36.13 टक्के नोटा : 3788 मतं 0.33 टक्के यापूर्वी 4 वेळा खासदार भावना गवळी या शिवसेनेच्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्या चार वेळा खासदार राहिल्या आहेत. 2014च्या निवडणुकीत भावना गवळी यांना 4 लाख 77 हजार 905 मतं मिळाली होती. त्यावेळी गवळींनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता. या मतदारसंघात यवतमाळच्या 4 आणि वाशिमच्या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले यवतमाळ, पुसद, दिग्रस, राळेगाव आणि वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि कारंजा हे विधानसभा मतदारसंघ येतात.फेररचनेच्या आधी हा फक्त वाशिम मतदारसंघच होता. नंतर त्यात यवतमाळही जोडण्यात आला. वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: राहुल गांधी अमेठीतून पराभूत कधीकाळी होता काँग्रेसचा बालेकिल्ला कधीकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा आणि नंतर राष्ट्रवादी-काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1996 मध्ये मात्र ही जागा भाजपला मिळाली.  यानंतर 1999 पासून या जागेवर भावना गवळी निवडणूक लढवत आहेत आणि जिंकतदेखील आहेत. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, वाशिम, कारंजा, राळेगाव या जागांवर भाजपचा कब्जा आहे. दिग्रसमध्ये शिवसेना तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे. वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: भारताच्या उज्ज्वल भविष्याची गॅरेंटी - नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2014चा निकाल भावना गवळी, शिवसेना : 4,77,905 मतं अॅड. शिवाजीराव मोघे, काँग्रेस : 3,84,089 मतं भावना गवळी यांचा 93,816 मतांनी विजय SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका
    First published:

    Tags: Yavatmal Washim S13p14

    पुढील बातम्या