ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 1 मार्च: दहावीला शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांचा चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न असतो. राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी नेहमीच लातूर पॅटर्न ची चर्चा असते. परीक्षेत चांगल्या यशाचा फॉर्म्युला म्हणून लातूर पॅटर्नकडे पाहिले जाते. लातूरमधील विविध महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना भूगोलाचा पेपर सोडवण्याच्या काही खास ट्रिक्स सांगितल्या जातात. त्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये वाढ होते, तर काहींना भूगोलात पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. लातूरच्या शाळांचा निकाल अधिक लातूर शहरातील नामांकित व इतर सर्व विद्यालयाचा निकाल हा 80 ते 90 टक्के इतका लागतो. यामुळे सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचा ओढा याकडे लागला आहे. पुण्याला जरी शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधले जात असले तरी विद्यालयीन शिक्षणासाठी लातूरने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. Latur Pattern: लातूर पॅटर्नमुळं इंग्रजी झालं सोप्पं, 10 वी चा पेपर सोडवण्याच्या पाहा खास ट्रिक्स, Video दहावीला 40 गुणांना भूगोल दहावी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भूगोल विषयासाठी लातूर पॅटर्नमध्ये काही खास ट्रिक्स वापरल्या जातात. दहावीला भूगोल हा विषय 40 मार्कांचा आहे. अर्थशास्त्र या विषयाचे समायोजन यात केले आहे. आधीच्या परीक्षा पद्धतीमध्ये भूगोल व अर्थशास्त्र या विषयांसाठी वेगवेगळे मार्क होते पण आता ती पद्धत बंद झाली असल्याची माहिती शिक्षक कुलकर्णी यांनी दिली. भूगोल या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना एकूण 28 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. ज्यामुळे भूगोल विषयात मार्क मिळवणे सोपे आहे. Latur Pattern : लातूर पॅटर्न वापरा, दहावीच्या विज्ञानातही चांगले मार्क्स मिळवा! Video भूगोलचा पेपर कसा सोडवावा? 1. प्रश्न एक व दोन मध्ये रिकाम्या जागा आणि जोड्या लावा यासाठी पाठ्यपुस्तकाचे वाचन नियमित करावे. ज्यामुळे आपले मार्क कट होणार नाहीत. 2. प्रश्न क्रमांक तीन मध्ये एका वाक्यात उत्तरे द्यायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण वाक्यात उत्तरे लिहावेत. 3. प्रश्न क्रमांक चार हा नकाशा वर आधारित प्रश्न आहे. नकाशात ठिकाणे दाखवण्यासाठी योग्य सूचीचा वापर करावा. ज्यामुळे मार्क कट होणार नाहीत. 4. प्रश्न क्रमांक पाच हा भौगोलिक कारणे द्या असा आहे. यात उत्तरे लिहिताना मुद्देसूद उत्तरे लिहावी. ज्यामुळे परीक्षकाला मार्क कापता येणार नाहीत. 5. प्रश्न क्रमांक सहा हा आलेखाचा प्रश्न आहे. यात विद्यार्थ्यांनी आलेखाचे योग्य प्रमाण द्यावेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतील. 6. भूगोल या विषयाची तयारी करताना सतत पाठ्यपुस्तकाचे वाचन करावे व त्या खालील प्रश्नसंच सोडवावेत. 7. आलेखाचा वारंवार सराव करून त्याचे प्रमाण काढण्याचा सराव करावा. 8. विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेसाठी विविध प्रश्नसंच सोडवावेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी चूक कुठे होते हे त्यांच्या लक्षात येईल व त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. 9. नकाशा काढण्याचा सराव करावा. या सर्व पद्धतीचा वापर करून भूगोल या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतील, असे त्र्यंबक कुलकर्णी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.