जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News : स्कूल बस चालकाची कर्तव्यनिष्ठा; स्वतःचे प्राण सोडले पण 25 विद्यार्थ्यांना वाचवलं

Latur News : स्कूल बस चालकाची कर्तव्यनिष्ठा; स्वतःचे प्राण सोडले पण 25 विद्यार्थ्यांना वाचवलं

स्कूल बस

स्कूल बस

Latur News : लातूर शहरात एक स्कूल बस चालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूपूर्वी या चालकाने 25 विद्यार्थ्यांचे प्राच वाचवले आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

सचिन सोळुंके, प्रतिनिधी लातूर, 20 जून : पाण्यात चालणाऱ्या जहाजाचा कॅप्टन कितीही मोठं संकट आलं तरी तो जिवंत असेपर्यंत स्टेरिंग व्हील सोडत नाही, असं म्हटलं जातं. अगदी जहाज बुडत असतानाही तो शेवटपर्यंत जहाजातील लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. अशीच एक घटना लातूरमध्ये समोर आली आहे. आपल्या जीवावर बेतलं असतानाही स्कूल बसच्या चालकाने 25 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काय आहे घटना? लातूर येथील श्री रविशंकर शाळेची स्कूल बस दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जात होती. वाहन चालक महावीर भोपलकर यांना याचवेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. महावीर भोपलकर यांना समजलं की आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यावेळी तात्काळ त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि वाहन बंद केले. विद्यार्थी सुरक्षित आहेत का? याची खात्री केली. दररोज आपल्याबरोबर असणाऱ्या महावीर काकांना त्रास होतो याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. वाचा - अपघात वार! दोन वेगवेगळ्या अपघातात 7 ठार; नांदेडमध्ये 4 तर रिसोड मार्गावर तिघांचा मृत्यू बस चालकाला वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न.. शिवनगर भागातील लोकांनी येऊन त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्नही केला. स्कूल बसमधील काही  विद्यार्थ्यांनी धावत जाऊन जवळील एका डॉक्टरला घेऊन आले. पण दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली होती. घटना घडली त्यावेळेस गाडीत 25 विद्यार्थी होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावीर यांना तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेमधील कर्मचाऱ्यांना आणि स्कूलबस चालकांच्या संघटनेला कळल्यानंतर सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. महावीर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्याचं रक्षण केलं. याचीच चर्चा करत सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात